शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अपघातात दोघे जीवलग मित्र ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 22:19 IST

शिरपूर : भावेर येथील रहिवाशी, खाजगी कामासाठी धुळ्याला गेले होते

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : मुंबई-आग्रा महामार्गावरील कुरखळी फाट्यानजिक रस्ता ओलांडत असतांना एका भरधाव वेगाने येणाºया कारने दुचाकी गाडीला जोराने धडक दिल्याने तालुक्यातील भावेर येथील दोघे जीवलग मित्रांचा अपघातात जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली़ही घटना शुक्रवार १४ रोजी संध्याकाळी ५़३० ते ६ वाजेच्या सुमारास कुरखळी फाट्यानजिक असलेली हॉटेल स्वागत समोर घडली़शिरपूर तालुक्यातील भावेर येथील संजय भिका धनगर (४५) व राजेंद्र चुनिलाल धनगर (४७) हे दोघे जीवलग मित्र असल्यामुळे खाजगी कामासाठी ते धुळ्याला गेले होते़ काम आटोपून ते गावाकडे परत येत असतांना मार्गावरील कुरखळी फाट्यानजिक असलेली हॉटेल स्वागत त्यांचे आप्तजण मोहन धनगर यांनी चालविण्यासाठी घेतल्यामुळे त्यांना भेटण्यासाठी ते गेले होते़ मात्र हॉटेल चालकांनी त्यांना जेवणाचा आग्रह केल्यानंतर तेथून जेवन करून बाहेर निघाल्यानंतर रस्ता ओलांडत असतांना धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणाºया एका कारने दुचाकी गाडीला जब्बर धडक दिली़ धडक एवढी जब्बरदस्त होती की दुचाकी गाडीवरील दोघे स्वारांचा जागीच मृत्यु झाला़ घटनेचे वृत्त कळताच आमदार अमरिशभाई पटेल यांचे स्वीय सचिव अशोक कलाल, मार्केट कमिटी सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, नगरसेवक चंदनसिंग राजपूत, भाजपाचे शहराध्यक्ष हेमंत पाटील, हेमराज राजपूत, भावेरचे सरपंच लहु गुजर, अ‍ॅडग़ोपालसिंग राजपूत, कल्याणसिंग राजपूत, रामचंद्र ठाकरे, हिंमतराव धनगर, अरमान पटेल, महेमुद पटेल, पिंप्रीचे संजय धनगर आदींनी उपजिल्हा रूग्णालयात धाव घेतली़मयत संजय धनगर यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, १ मुलगा, मुलगी असा परिवार आहे तर राजेंद्र धनगर यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, १ मुलगी असा परिवार आहे़ दोघांची अंत्ययात्रा आज १५ रोजी सकाळी १० वाजता काढली जाणार आहे़ दरम्यान या घटनेची माहीती कळताच गावात शोककळा पसरली होती़ 

टॅग्स :Dhuleधुळे