शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
2
शुबमन धमाका...; इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकत केली विराटची बरोबरी; 'हे' मोठे विक्रम करत रचला इतिहास!
3
Shubman Gill Double Century : शुबमन गिलचं विक्रमी 'द्विशतक'; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कॅप्टन
4
मोहम्मद शमी दरमहा देणार ४ लाखांची पोटगी; निर्णयावर Ex पत्नी हसीन जहाँ म्हणते- कायद्याचं राज्य आहे..!!
5
"हे दोघे एकत्र येणे म्हणजे, मराठी...; फक्त स्वार्थासाठी एकत्र येताहेत!" नारायण राणे यांचा एकाच वेळी दोन्ही ठाकरेंवर हल्लाबोल
6
Viral Video : पावसात पळत जाऊन दोरीवरचे कपडे काढण्याची गरजच नाही! 'हा' जुगाड सोशल मीडियावर व्हायरल
7
WTC मध्ये २००० धावांसह १०० पेक्षा अधिक विकेट्स! जडेजाच्या नावे झाला वर्ल्ड रेकॉर्ड
8
“शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, त्यासाठी समिती नको”; विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
9
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
10
डोक्यावर पदर घेतला नाही म्हणून पती चिडला, पत्नीचा राग लेकराला आपटून काढला! चिमुकल्याचा मृत्यू
11
"तो वाद मराठी-अमराठी नव्हता"; ठाण्यात शिवसैनिकाला झालेल्या मारहाणीवर आदित्य ठाकरेंचे स्पष्टीकरण
12
Smriti Irani : "मुलगा झाला नाही म्हणून आईला सोडावं लागलं घर"; स्मृती इराणींनी सांगितला 'तो' वाईट प्रसंग
13
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
14
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
15
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
16
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
17
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
18
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
19
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
20
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी

बोगस डॉक्टर शोध मोहीम थंडावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2020 13:38 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्यावर्षी बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. त्यावर कारवाई झाल्यामुळे ...

 लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर : शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात गेल्यावर्षी बोगस डॉक्टरांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. त्यावर कारवाई झाल्यामुळे बऱ्यापैकी आळाही बसला. मात्र, ही मोहीम थंडावल्याने पुन्हा ह्यजैसे थेह्ण हा व्यवसाय बिनधास्तपणे सुरू झाला असून रूग्णांच्या जीवाशी खेळले जात आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.शहरासह तालुक्यात ह्यमुन्नाभाई एमबीबीएसह्ण म्हणजे बोगस डॉक्टर शोध मोहिम थंडावलेली आहे़ राज्यात बोगस डॉक्टरांचे पेव फुटल्याचे समोर आल्याने आरोग्य विभागाने बोगस डॉक्टर शोध मोहिमेचा धडक कृती कार्यक्रम गेल्यावर्षी राबवला होता. मात्र, त्यानंतर ही कारवाई थंडावलेली दिसत आहे. गेल्या तीन वर्षात तालुक्यात ५ बोगस डॉक्टरांवर गुन्हे देखील नोंदविण्यात आले आहेत. त्यानंतर देखील बोगस डॉक्टरांचा वावर थांबलेला दिसत नाही. पश्चिम बंगालमधील काही तरूण शहरासह ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवसाय थाटून रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. विशेषत: या डॉक्टरांना मदत करणारे कंपाऊंडरही स्वत:ला डॉक्टर समजून रूग्णांवर औषधोपचार करीत आहेत. या बोगस डॉक्टरांकडे कुठलेही वैद्यकीय प्रमाणपत्र वा वैद्यकीय पदवी नसून आदिवासी भागातील जनतेवर अघोरी, स्टेराँईड व विविध प्रकारच्या इंजेक्शन, सलाईनद्वारे उपचार करीत आहे. रूग्णांचे आजारही त्यांना लक्षात येत नाही, तरी औषधोपचार करतात. परिणामी निदान न झाल्याने रूग्णाचा मृत्यू होऊ शकतो. कमी जास्त औषध देवून रूग्णांकडून लुबाडणूक करीत आहेत. अशिक्षितांचा गैरफायदा घेत बोराडी परिसरात किमान २५ ते ३० डॉक्टर बिनधास्तपणे रूग्णांच्या जीवाशी खेळत आहेत. बहुतांश डॉक्टरांकडे होमिओपॅथीची पदवी असतांनाही ते अ‍ॅलोपॅथीची प्रॅक्टीस करीत आहेत. पथकाकडून खाजगी दवाखान्यांची तपासणी होणार, हे कळताच ह्यमुन्नाभाई एमबीबीएसह्ण डॉक्टर दवाखान्यांना कुलूप लावून काही दिवस गायब राहतात. शासन निर्णयानुसार आता बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कमिटी आहे. फक्त तालुकास्तरीय समिती त्यास मदत करते. ग्राम समितीला देखील कारवाईचे अधिकार दिले आहेत. मात्र, तसे होत नाही. सध्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश नाहीत.सद्यस्थितीत कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गाव व परिसरात वैद्यकीय शैक्षणिक अर्हता नसलेले बोगस डॉक्टर रुग्णांवर अ‍ॅलोपॅथी पध्दतीने उपचार करीत आहेत. गावातील ग्राम समिती सरपंच, ग्रामसेवक, पोलिस पाटील यांच्यामार्फत अशा वैद्यकीय व्यवसायिकांना मज्जाव करण्यात यावा. ग्रामसभा घेवून अशा लोकांवर आळा घालण्याबाबत उपाय योजना कराव्यात, गावाच्या फलकावर बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांची यादी लावावी. जेणेकरून लोकांमध्ये जनजागृती होईल, अशा आशयाचे पत्र बीडीओंनी सरपंच, ग्रामसेवक व पोलिस पाटलांना दिले आहे.