जिल्ह्यासह राज्यात थॅलेसिमिया रुग्णांना रक्ताचा तुडवडा निर्माण झाला आहे.
शासनामार्फत विविध सेवाभावी संस्थांना रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार-दोडाईचा येथील स्व. अशोकभाऊ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. सदर रक्तदान शिबिर श्रीराम मंदिरात झाले.
रक्तदान शिबिराला आ. जयकुमार रावल यांनी भेट दिली. शिबिरास धुळे येथील जीवन ज्योती ब्लड बँकचे डॉ. भाग्यश्री सैंदाणे, सुचित्रा विश्वास, दिनेश पाटील, जगदीश सोनार आदींचे सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र रामोळे, प्रफुल्ल भोई, दीपक ओतारी, हेमंत भोई, केदार चौधरी, मनोज माळी, मोहसीन सोनवणे, बाबाजी धनगर, मनीष ठाकूर, लोकेश पाटील आदींनी परिश्रम घेतले.
दान शिबीरात रक्तदान करताना: