शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

धुळे कॉँग्रेस कमिटीतर्फे नोटबंदीच्या निषेधार्थ काळा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 15:21 IST

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : घोषणाबाजीने दणाणला परिसर

ठळक मुद्दे० निदर्शनासाठी जिल्हाभरातून कॉँग्रेसचे पदाधिकारी दाखल. ० विद्यमान सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. ० भाजपा सरकारची सत्ता घालविण्यासाठी एकजूट व्हा, चे आवाहन कॉँग्रेसच्या पदाधिका-यांनी केले.

धुळे  :  नोटाबंदीच्या निर्णयाला एक वर्ष बुधवारी पूर्ण होत आहे. या निर्णयाच्या विरोधात   धुळे कॉँग्रेस कमिटीतर्फे बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी सरकारच्या विरोधात दिलेल्या घोषणांमुळे येथील परिसर दणाणून सोडला. यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे, की केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयामुळे उद्योग अडचणीत आले आहे. २५ लाख लोकांच्या नोकºयाही गेल्या. देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून उद्योगांवरही संक्रांत आली. त्याविरोधात कॉँग्रेसच्या पदाधिकाºयांनी संताप व्यक्त करीत आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष श्याम सनेर, कॉँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. ललिता पाटील, शहराध्यक्ष युवराज करनकाळ, माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख, आमदार कुणाल पाटील, जि.प.  अध्यक्ष शिवाजी दहिते, जि.प.चे समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, किशोर पाटील, डॉ. दरबारसिंग गिरासे, साबीर शेख, प्रभाकर चव्हाण, इस्माईल खान पठाण, कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अलोक रघुवंशी,  प्रभा परदेशी, विमल बेडसे, नाजनीन शेख, गायत्री जयस्वाल, बानु शिरसाठ उपस्थित होते. 

भारिप बहुजन महासंघातर्फे लुटारूंचा दिवस भारिप बहुजन महासंघातर्फे बुधवारी नोटाबंदीच्या विरोधात ‘लुटारूंचा दिवस’ पाळण्यात आला. यानिमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी प्रा.  बाबा हातेकर, भैय्यासाहेब पारेराव, मिलिंद वाघ, आकाश बागुल, आनंद वानखेडे, योगेश जगताप, योगेश बेडसे, सागर मोहिते, नीलेश अहिरे, राकेश खैरनार आदी उपस्थित होते.