शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

‘इलेक्टिव्ह मेरिट’, संयमी भूमिकेच्या जोरावर भाजपचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 23:16 IST

सूक्ष्म नियोजनावर दिला भर : बंडखोरीचा दबाव झुगारत यशस्वी खेळी, मुख्यमंत्र्यांच्या सभेचाही फायदा

निखील कुलकर्णी। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : महापालिका निवडणूकीत स्पष्ट बहूमत मिळवत भाजपने कोण ‘पॉवरफुल्ल’ हे दाखवून दिले़ ‘इलेक्टिव्ह मेरिट’, संयमी भुमिका व अखेरच्या क्षणी झालेला धनशक्तीचा वापर हे भाजपच्या विजयाचे यशस्वी गणित ठरले़ मनपा स्थायी समितीत केवळ एक सदस्य असतांना सभापती पदावर वालिबेन मंडोरे यांना विराजमान करत भाजपने निवडणूकीच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकले होते़ त्यानंतर सत्ताधारी पक्षातील अनेक दिग्गजांना भाजपने ‘इलेक्टिव्ह मेरिट’ लक्षात घेऊन प्रवेश दिला व त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरला़ त्याचप्रमाणे आमदार अनिल गोटे यांच्या बंडखोरीचा दबाव व टिका यांना सामोरे जातांना केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ़ सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन व जयकुमार रावल या मंत्र्यांनी दाखवलेला संयम देखील तितकाच महत्त्वाचा ठरला़ पण संयम राखत असतांनाच त्यांनी टिकेला योग्य वेळी उत्तरे देत जनतेसमोर वास्तववादी भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला़ भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा खरा कस निवडणूकीच्या अंतिम टप्प्यात लागला़  परंतु संयम राखत आमदार गोटे यांना अखेरपर्यंत झुलवत ठेऊन भाजपने ऐनवेळी एकटे पाडले व त्यासाठी खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मदतीचा हात घेतला ही भाजपची सर्वात यशस्वी खेळी ठरली व लोकसंग्रामचा पराभव झाला़ शिवसेनेला अंतर्गत गटबाजी, काही विकास कामांना विरोध केल्याने आमदारांशी झालेला संघर्ष व त्यातून झालेली पक्षाची बदनामी, प्रभागात मर्यादित विकास व प्रभावी प्रतिस्पर्धी यांमुळे पराभव पत्करावा लागला़ राष्ट्रवादी-काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नसले तरी स्पर्धेत अखेरपर्यंत ते यशस्वीपणे टिकून राहिले़ एमआयएमने जळगाठपाठोपाठ धुळयात मिळवलेले यश लक्षवेधी ठरले़तर सपाची एक जागा  गटबाजी व मत विभाजनामुळे कमी झाली़ बसपाने विकासाच्या जोरावर एकमेव जागा कायम राखली़ 

टॅग्स :Dhuleधुळे