शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात भाजप सत्तेच्या दारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2018 12:29 IST

कॉँग्रेस-राष्टÑवादीच्या आघाडीत झाली घसरण, शिवसेनेचीही मुसंडी

ठळक मुद्देभाजपाने ३७ जागांवर घेतली आघाडीनिकालाची शहरात प्रचंड उत्सुकतालोकसंग्रामची आघाडी तीन वरून दोनवर आलेली आहे.

आॅनलाईन लोकमतधुळे- महानगरपालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू झालेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार  भाजपने ३७ जागांवर आघाडी घेतली असून, हा पक्ष सत्तेच्या दारात असल्याची चर्चा आहे. तर कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसची आघाडी २८ वरून १४ जागांवर आलेली आहे. अद्याप एकही जागेचा निकाल हाती आलेला नाही. दुपारी दीड वाजेपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.महानगरपालिकेच्या मतमोजणीला सकाळी १० वाजेपासून नगावबारी येथील शासकीय गोदामात सुरू झालेली आहे. दुपारी १२.३० वाजेपर्यंत  हाती आलेल्या माहितीनुसार भाजपाने आतापर्यंत ३७ जागांवर आघाडी घेत या पक्षाने सत्तेच्या दारापर्यंत मजल मारली आहे. त्यांना बहुमतासाठी अवघ्या एका जागेवर आघाडी मिळणे गरजेचे आहे. दरम्यान सुरवातीला कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेसने भाजपच्या पाठोपाठ २८ जागांवर आघाडी घेतली होती. परंतु या पक्षांना ही आघाडी कायम ठेवता आली नाही. मिळालेल्या माहितीनुसार कॉँग्रेस-राष्टÑवादी कॉँग्रेस १४ जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेनेने मात्र तीन जागांवरून ७ जागांवर आघाडी घेत चांगलीच मुसंडी मारलेली आहे. लोकसंग्रामची आघाडी तीन वरून दोनवर आलेली आहे. याशिवाय इतर तीन जणांनीही आघाडी घेतली आहे.निकालाची उत्सुकता- दरम्यान निवडणुकीचे अद्याप आघाडीच जाहीर होत असून, अधिकृत निकालाची शहरात प्रचंड उत्सुकता लागून आहे. शहरातील चौकाचौकात निवडणुकीच्या कौलबाबत चर्चा सुरू आहे. दरम्यान कुठेही अनुचित घटना घडू नये यासाठी शहरातील प्रमुख चौकात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. 

टॅग्स :DhuleधुळेElectionनिवडणूक