दुभाजकाला धडक
धुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर शिरपूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कलमाडी गावाच्या शिवारात एमएच १८ डब्ल्यू ५८४१ क्रमांकाची कार भरधाव वेगाने येत असताना दुभाजकाला जोरदार धडकली. यात कारसह दुभाजकाचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. ही घटना ७ जानेवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात आनंदसिंग ओंकार पावरा (४५, रा. जोयदा, ता. शिरपूर) याच्या विरोधात नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
गावठी दारू पकडली
धुळे : शिंदखेडा तालुक्यातील वेडोदे, म्हळसर गावाच्या शिवारात असलेल्या भिलाटीतील राहत्या घराच्या आडोश्याला गावठी बनावटीची दारू नरडाणा पोलिसांनी छापा टाकून पकडली. २ हजार ३६० रुपये किमतीची ६० लिटर अंबूस उग्रवासाची गावठी दारू पकडण्यात आली. ही घटना ८ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी लताबाई राजू पवार हिच्या विरोधात गन्हा दाखल झाला.