धुळे : भारतीय वनसेवेतील सनदी अधिकारी भगवान तुळशीराम भगत नियत वयोमानानुसार ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले़ यानिमित्त त्यांचा सत्कार झाला़ मुख्य वनसंरक्षक धुळे यांच्या कार्यालयात छोटेखानी समांरभ नुकताच पार पडला़यावेळी मुख्य वनसंरक्षक ए. एस. कळसकर सामाजिक वनीकरण नाशिकचे पी. जे. लोणकर उपवन संरक्षक दादासाहेब शेंडगे, दक्षता विभागीय वनाधिकारी वावरे, जळगावचे सामाजिक वनीकरण विभागीय वनाधिकारी शेख, विभागीय वनाधिकारी श्रीमती कुळकर्णी, जळगावचे उपवनसंरक्षक पगार, यावलचे उपवनसंरक्षक मोराणकर, नंदूरबारचे उपवनसंरक्षक केवटे आदी उपस्थित होते़३५ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत सर्वाधिक सेवा त्यांनी नक्षलग्रस्त भागात बजावली होती़
वनसेवेतील सनदी अधिकारी भगत निवृत्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 22:17 IST