शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

‘अक्कलपाडा’ पायथ्याशी वारंवार मानव व हिंस्त्रप्राण्यांचा संघर्ष सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 11:59 IST

म्हसदी, चिंचखेडा परिसर । मानवावर बिबट्याचा हल्ला तर पाळीव प्राणी फस्त

लोकमत न्यूज नेटवर्कम्हसदी : साक्री तालुक्यातील चिंचखेडे येथे अक्कलपाडा धरणाच्या पायथ्याशी असलेले हे गाव या गावालगत सध्या हिंस्र प्राण्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे. या गावामध्ये तीन बिबट्या माद्यांनी आठ ते दहा बछड्यांना जन्म दिला असल्याचे याबाबत ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. याबाबत वनविभागाने खबरदारीने पावले उचलावि. वन्य प्राण्यांचा मोठा वावर वाढल्यामुळे वारंवार मनुष्य व हिंस्त्रप्राणी यांचा संघर्ष सुरुच आहे.गेल्या आठ दिवसांपूर्वी माधव पाटील यांच्यावर बिबट्याचा हल्ला तर रमेश बच्छाव यांच्या विहिरीत बिबट्याचा मृत्यू पावल्याची घटना घडली. अनेक जणांचे गोºहे तर अनेकांच्या शेळ्या फस्त केल्या आहेत. एखादा हिंस्र प्राणी येऊन आपल्यावर हल्ला करेल याची शाश्वती नसल्याने ग्रामस्थांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वनविभागाने उपाययोजना करून येथील ग्रामस्थांना अभय द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.म्हसदी परिसर विविध ठिकाणी हिंस्र प्राणी पाण्याच्या शोधात इतरत्र भटकंती करीत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे हिंस्र प्राणी मानवी वस्तीच्या अगदी जवळ येत असतात. त्यामुळे अशास्थितीत मानव व हिंस्र प्राणी यांच्यात संघर्ष निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. प्राण्यांचा वावर वाढल्यास याचा परिणाम ग्रामीण भागातील जनजीवनावरही होताना दिसून येतो.ग्रामस्थ शेतात तसेच ठिकठिकाणी रात्रीच्या वेळी परिसरात वावरतात. हिंस्र प्राण्यांमुळे सध्या ग्रामीण भागामध्ये रब्बी हंगाम असून गहू, हरभरा, भुईमूग, कांदे, मका, रब्बी पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीचा वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी पिकांना रात्री पाणी देण्यासाठी जात असतो. पिकांना पाणी नाही दिल तर पीक हातची जातील त्यामुळे विज कंपनीने गांभीर्य ओळखून दिवसा वीजपुरवठा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परंतु शेतशिवारात हिंस्र प्राण्यांचा वावर वाढला असल्याने शेतीची कामे करण्यासाठी शेतमजूर धजावत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे याचा परिणाम रब्बी हंगामावर झाला असून हिंस्र प्राण्यांमुळे संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. वारंवार होणारे हल्ले लक्षात घेता वनविभागाने तत्परता दाखवणे गरजेचे आहे. मानवासह पाळीव प्राण्यांवरही हिंस्रप्राण्यांचे हल्ले वाढले आहेत. त्यामुळे अनेकवेळा पशु पालकांचे आर्थिक नुकसान होत असून शेतकरी व पशुपालक मेटाकुटीस आला आहे. याबाबत वनविभागाने तातडीने हिंस्र प्राण्याला पिंजºयात जेरबंद करण्यात यावे, अशी अपेक्षा चिचंखेडे ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Dhuleधुळे