शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात वाहतुकीस अडथळा, १५ लोटगाड्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 22:48 IST

वाहतूक शाखा : जेबी रोडसह भागात मोहीम

ठळक मुद्देशहर वाहतूक शाखेची कारवाई१५ जणांच्या लोटगाड्या जप्तन्यायालयात पाठवून ठोठावला दंड

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शहरातील वर्दळीच्या जेबी रोड, टॉवर बगिचा, गल्ली नंबर ४ या भागात गुरुवारी सकाळी साडेदहा ते दुपारी सव्वाबारा वाजेच्या दरम्यान अचानक वाहतूक शाखेने मोहीम राबविली़ कारवाई करत १५ जणांच्या लोटगाड्या जप्त करण्यात आल्या़ शहरातील आग्रा रोडवर महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील महिन्यात कारवाई करण्यात आली होती़ पण, त्याचा नंतरच्या कालावधीत काहीही फरक पडलेला नव्हता़ एरव्ही वाहतूक शाखेकडून वेळोवेळी हॉकर्सधारकांवर कारवाई केली जाते़ तेवढ्या पुरता रस्ता मोकळा होतो़ दंडात्मक कारवाई केल्यानंतर पुन्हा जैसे-थेच प्रकार होत असल्याने प्रशासनाने हॉकर्सधारकांपुढे हात टेकले असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे़ यांनी केली कारवाईअपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस निरीक्षक प्रकाश मुंडे, विलास परदेशी, नितीन अहिरराव, हरुण शेख, शांताराम जाधव, हसन शहा, यशवंत पाटील, दिनेश देवरे, श्याम काळे, ज्ञानेश्वर साळुंखे, चंद्रकांत पाटील, धनंजय गोरे, मुकेश वाघ, शशि देवरे, कुणाल साळवे, सय्यद अली सय्यद, पंकज शिंदे, अमोल भामरे यांनी कारवाई केली़ न्यायालयात पाठविलेगुरुवारी दुपारी वाहतूक शाखेने कारवाई केल्यानंतर ४ जणांना न्यायालयात पाठविण्यात आले होते़ त्यांना प्रत्येकी ३०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे़ उर्वरीत ११ जणांना शुक्रवारी न्यायालयात पाठविण्यात येणार आहे़ त्यांच्या लोटगाडी वाहतूक शाखेत आणून त्या जप्त केल्या आहेत़

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस