शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

शिंदखेडा येथे उद्या बालाजी महाराजांचा रथोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:26 IST

१४४ वर्षांची परंपरा, १४ रोजी पालखी सोहळा

आॅनलाइन लोकमतशिंदखेडा : येथील सालाबादाप्रमाणे १४४ वर्षांची परंपरा असलेला रथोत्सव अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी (दि.१३ आॅक्टोबर) दुपारी एक वाजता निघेल. तर पालखी सोहळा १४ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता होणार असल्याची माहिती बालाजी मंदिराचे मठाधीपती मेघशाम बुवा यांनी दिली .सकाळी श्री लक्ष्मी व्यंकटेशाला रुद्र अभिषेक झाल्यानंतर सकाळी सुदर्शन चक्राची मिरवणूक पंचमंडळी भक्तगण यांचेसह निघत असते. सुदर्शन चक्र मस्तकी धरून मंगलवाद्य सह श्रींच्या नामघोषात व रथ मार्गाने मिरवत घेऊन येण्याचा परंपरागत मान गिरासे घराण्यातील मधुकर गिरासे यांचेकडे असतो. लक्ष्मी व्यंकटेश रथावर आरूढ होण्यापूर्वी श्रीराम बालाजी मंदिरात मंगल वाद्यासह रथावरील ब्रह्मवृंद, पंचमंडळी, भक्तगणांच्या समवेत आरती होते. आरतीचा मान परंपरागत राउळ घराण्याकडे असून हिम्मतसिंह भिमसिंह राउळ यांचे हस्ते आरती होते. मठाधीपती मेघश्याम बुवा यांचे हस्ते आरती होऊन रथ मिरवणुकीस प्रारंभ होतो. बालाजी महाराज की जय च्या नामघोषाने परिसर दुमदुमून जातो. या रथोत्सवासाठी परिसरातील व बाहेरील भक्तगण रथ ओढतात.रथास मोगरी लावणारी सेवेकरी मंडळी कुशलतेने मोगरी लाऊन रथ काबूत ठेवण्याचे धैर्य करीत असतात .सोमवारी पालखी सोहळा१४ रोजी सायंकाळी ४ वाजता श्रीराम बालाजी मंदिरातून लक्ष्मी व्यंकटेशाची पालखीतून मिरवणूक निघत असते. पालखी धरून नेण्याचा मांन भोई समाज बांधवांचा असतो. या सोहळ्यात गावातील व जिल्ह्यातील भजनी मंडळी भजनात सहभागी होतात. त्याचबरोबर या पालखी सोहळ्यात विविध वेशभूषा करून नृत्य सादर करणारे कलोपासक सहभागी होतात. या ठिकाणी होणारी फटाक्यांची आतिषबाजी डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. विविध नाविन्यपूर्ण ,भावपूर्ण ,उत्साहपूर्ण ,उत्सवाची सांगता अश्विन व द्वितीयेस लक्ष्मी व्यंकटेशाच्या अमृत स्नानानंतर लघुरुद्र अभिषेकाने होते.देविदास देसले , हिमतसिह राऊळ, योगेश सिंपी, दिलीप चौधरी, श्रीराम चौधरी, उदय वानखेडे , जीवन भामरे आदी पंच मंडळ यांनी शहर व तालुका परिसरातील भाविकांनी रथउत्सवाचचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Dhuleधुळे