शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे; आम्ही फक्त शिव्या खाणारे आहोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 14:48 IST

सुधीर मुनगंटीवार : पांझरा नदी किनारी झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन

ठळक मुद्देआमदार गोटे यांनी कार्यक्रमात अर्थमंत्री यांना आम्हांला काही नको, असे सांगत आमच्यावर वरदहस्त राहू द्या, अशी मागणी केली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत प्रस्तावित झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन झाले. शिवसैनिक व आमदार गोटे यांच्यात गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या वादामुळे निष्ठावंत शिवसैनिकांनी पालकमंत्री दादा भुसे यांना पत्र देत कार्यक्रमात उपस्थित राहू नका, असे आवाहन केले होते. निष्ठावंत शिवसैनिकांच्या शब्दाचा मान ठेवत पालकमंत्री भुसे कार्यक्रमाला तसेच ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या देखील कार्यक्रमाला येणार असे भाजपाच्या वतीने सांगण्यात आले होते. मात्र, त्या देखील कार्यक्रमाला उपस्थित नव्हत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :   केवळ राजकारणासाठी राजकारण करायचे नाही, असे भाजपा पक्षाचे धोरण आहे. अगोदरच्या सरकारने देशात ४७ वर्ष २ महिने एक दिवस सत्ता उपभोगली. या काळात त्यांनी केलेली घाण साफ झाली का नाही, असे ते आम्हांला तीन वर्षात विचारू लागले आहेत. त्यांनी देशात करून ठेवलेली वाईट अवस्था आम्ही टप्प्याटप्याने संपवत आहोत. तरीही वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे, आम्ही फक्त शिव्या खाणारे आहोत, असे संतप्त प्रतिपादन राज्याचे अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे केले. पांझरा नदी किनारी प्रस्तावित झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगे महाराज यांच्या स्मारकाचे भूमीपूजन गुरुवारी दुपारी त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर आमदार अनिल गोटे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष बबन चौधरी (ग्रामीण), तेजस गोटे, माजी महापौर मंजूळा गावीत, रजक महासंघाचे राष्टÑीय प्रदेशाध्यक्ष बालाजी शिंदे, परिट समजाचे राष्टÑीय उपाध्यक्ष एकनाथ बोरसे, राजेंद्र खैरनार व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वाहीद अली यांनी केले. आभार विजय वाघ यांनी मानले. 

मुलभूत गरजाही देऊ शकले नाही आधीचे सरकार भाजपा सरकार सत्तेत येण्यापूर्वीच्या सरकारने सत्ता उपभोगत असताना केवळ झोप ठोकली. मुलूभूत गरजाही ते जनतेला देऊ शकले नाहीत. २००१ साली राज्यात ६३ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. त्या थांबविण्यासाठी ‘त्या’ सरकारने कुठलीही व्यवस्था केली नाही. केली असती, तर शेतकºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले नसते. भाजपा सरकार  सत्तेत आल्यानंतर विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गेल्या तीन वर्षात जलयुक्त शिवार योजना, मुद्रा योजना, बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न, शेतकºयांची कर्जमाफी केली. देशासह राज्यात विकासाची कामे टप्प्याटप्याने सुरू आहेत. असे असतानाही देशात वाईट अवस्था निर्माण करणारे वेगळे असताना शिव्या मात्र विद्यमान सरकारला खावे लागत असल्याचे मंत्री मुनगंटीवार यांनी येथे म्हटले. 

१५ आॅगस्टला होणार अनावरण कार्यक्रमात सफारी गार्डन अंतिम आराखडा कसा राहिल? यावर आधारित तयार केलेल्या पुस्तिकेचे मंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. त्यावेळी आमदार अनिल गोटे यांनी सांगितले, की पांझरा नदी किनारी प्रस्तावित ११ कि.मी. लांबीचे रस्ते तयार करण्याची कामे प्रगतीपथावर आहेत. या रस्त्यांना शहरातील विविध कॉलनी व परिसरातील ५४ रस्ते येऊन मिळणार आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कमी होणार आहे. तसेच झुलता पूल, भगवान शंकराची मूर्ती व राष्टÑसंत गाडगेबाबा यांचा पूर्णाकृती पुतळ्याचे काम हे जून अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून १५ आॅगस्टला त्याचे अनावरण करण्यात येईल; असे त्यांनी सांगितले. 

कॉँग्रेसने पोसलेले  चोर देश सोडून पळू लागले कार्यक्रमात आमदार अनिल गोटे यांनी विरोधकांचा त्यांच्या शैलीत समाचार घेतला. त्यानंतर ते म्हणाले, की भाजपा केंद्र व राज्यात सत्तेत आल्यामुळेच कॉँग्रेसने पोसलेले चोर पळू लागले आहेत. हे सांगताना त्यांनी विजय मल्ल्या, निरव मोदी यांची उदाहरणे दिली. कॉँग्रेस सरकारच्या काळात झालेली घाण आता आम्हांला साफ करावी लागत असल्याचे आमदार गोटे यांनी सांगितले. 

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारDhuleधुळे