शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण पण क्रॉस व्होटिंग कुणाचा खेळ बिघडवणार?
2
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
3
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
4
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; गोळीबारात आतापर्यंत ९ मृत्यू ८० जखमी
5
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
6
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
7
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
8
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
9
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
10
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार
11
लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीत चोरांनी १०० मोबाईल अन् सोन्याच्या चेन केल्या लंपास; चार आरोपींना अटक
12
पूरग्रस्त भागात गेलेल्या काँग्रेस खासदाराला ग्रामस्थांनी खांद्यावर घेतलं, भाजपाने Video वरुन घेरलं
13
समृद्धी महामार्गावर अडीच कोटींची वॅक्सीन चोरी, आंतरराज्य टोळीला वाशिम पोलिसांनी केली अटक
14
मेहुल चोक्सीला जेलमध्ये स्वच्छ पाणी अन् टॉयलेट देणार; भारताने बेल्जियमला दिली १४ सुविधांची यादी
15
सरकारे उलथवून टाकण्यात तरुणाई सर्वात पुढे; आतापर्यंत 'या' देशांमध्ये झाले सत्तापालट
16
पतीला सोडून प्रियकरासोबत पळून गेली ५ मुलांची आई, लग्न केलं पण...; गावात रंगला हाय वोल्टेज ड्रामा!
17
विमा स्वस्त होणार म्हणून आनंद झाला होता? आता प्रीमियम वाढण्याच्या शक्यतेने वाढली चिंता
18
"क्षमतेपेक्षा जास्त हुंडा दिला तरीही..."; लेकीने लग्नाच्या ९ महिन्यांतच संपवलं जीवन, आईचा टाहो
19
एक लाख व्ह्यूज मिळाल्यावर इंस्टाग्राम किती पैसे देते? जाणून व्हाल हैराण!
20
"विरोधकांच्या ठिकऱ्या उडणार, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणाऱ्यांनी..."; भाजपाचा टोला

बबन झोटेंचा आमरण उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 17:27 IST

धुळे नगरपालिकेचे तत्कालिन कर्मचारी, मंत्रालयासमोर केला होता आत्मदहनाचा प्रयत्न

ठळक मुद्दे- बोगस भरतीच्या सीआयडी चौकशीची मागणी- मुख्यमंत्र्यांना निवेदनाव्दारे आमरण उपोषणाचा इशारा- मंत्रालयासमोर केला होता आत्मदहनाचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महापालिकेत १९८९ साली झालेल्या बोगस भरतीची सीआयडी चौकशी करावी या मागणीसाठी मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न करणारे तत्कालिन धुळे नगरपालिकेच्या सेवेतून कमी करण्यात आलेले कर्मचारी बबन झोटे हे आता २५ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास बसणार आहेत. महापालिकेने १९८९ मध्ये तत्कालिन राज्यमंत्र्यांनी आर्थिक व्यवहार करून बोगस कर्मचाºयांना न्याय दिला. परंतु काही जणांच्या मुलाखती घेऊनही त्यांना नेमणूकीचे स्वतंत्र आदेश न देता बोगस आदेशात नावे टाकून तत्कालिन नगरपालिकेने आपली फसवणूक केल्याचा आरोप बबन झोटे यांनी केला आहे. राज्यमंत्र्यांच्या आदेशाने जे बोगस कर्मचारी सेवेत सामावून घेतले याची जाणीव ठेवून मनपाने कामगार न्यायालयाच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याचे कारण नव्हते. पण आस्थापनाप्रमुखांची मागणी पूर्ण न केल्याने आमचे नुकसान करण्यात आले, असे बबन झोटे यांच्या निवेदनात नमुद आहे. दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाने, आपले निवेदन दिशाभूल करणारे असल्याचा खुलासा केला असला तरी आपली मागणी स्वच्छ व सत्य असून बोगस भरतीच्या सीआयडी चौकशीचे आदेश होत नाही तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवणार असल्याचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे़ सीआयडी चौकशीच्या मागणीसाठी २५ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर जलग्रहण करून आमरण उपोषणास बसणार असून आपले काही बरेवाईट झाल्यास धुळे महापालिका व महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, असा इशारा झोटे यांनी निवेदनाव्दारे दिला आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाDhuleधुळे