या अभियानांतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी आदिवासी वस्तीत जाऊन लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले, तसेच कोरोना लसीकरणासंदर्भात जनजागृती मोहीम राबवली गेली. बल्हाणे आदिवासी वस्तीमध्ये ५०० मास्क आणि २०० सॅनिटािझरच्या बाटल्या वाटप करून जनजागृतीचे कार्य करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नीलेश पाटील, सहा. कार्यक्रम अधिकारी डॉ. शरद भामरे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. कल्पना पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी आवश्यक एक्सटेंशनल ॲक्टिव्हिटी सेलचे प्रमुख डॉ. अश्पाक सिकलगर, डॉ. नरेश बागल, डॉ. सदाशिव सूर्यवंशी, प्रा. क्रांती पाटील यांचे सहकार्य मिळाले. रासेयो एककाचे विभागीय अध्यक्ष डॉ. प्रमोद पाटील यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती होती.
सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घेतलेला होता. त्यात विनोद मासुळे, चेतन कृष्णाजी पाटील, सागर सीताराम पाटील, राहुल सुपडू पाटील, सूर्यवंशी योगेश भटू, सागर मुरलीधर पाटील, विश्वास आनंदा पाटील, नितीन चंद्रशेखर पाटील, उद्धव दादाजी पाटील, राहुल अभीलाल पाटील, दिनेश रामदास पाटील यांचा समावेश होता.