दुसऱ्या कोरोना लाटेत कोरोनाने थैमान घातले असताना प्रत्येक गावात कोरोना रुग्ण मिळून येत असून, अनेक नागरिकांना कोरोना संसर्ग झाला आहे. काही दिवसांपूर्वी बेड मिळत नसल्याने कोरोनाविषयीची भीती वाढली होती. कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करीत असता कोरोनापासून सरंक्षण मिळविण्यासाठी लसीकरण करून घेणे केंद्र व राज्य सरकारने आवाहन करूनदेखील पिंपळनेर आदिवासी पश्चिम पट्ट्यात लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये अनेक प्रश्न, गैरसमज व शंका असल्याने लसीकरण केंद्रात जाण्यास टाळाटाळ करीत आहेत. यामुळे या भागातील लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक टाळाटाळ करीत आहेत. त्यामळे लसीकरण टक्का कमी असल्याने चिंतेचा विषय ठरत आहे. तर अनेक नागरिकांना त्रास होऊन देखील ते अंगावर काढतात; पण वेळवर तपासणी करून घेत नाहीत. यामुळे ग्रामीण भागातील रुग्णसंख्येत वाढ होत आहे. लसीकरण जास्तीस्त जास्त कसे करून घेता येईल यासाठी आदिवासी बचाव संघटनेचे तालुका प्रमुख गणेश गावित यांना आदिवासी पश्चिम पट्ट्यात लसीकरण करून घेण्यास नागरिक उत्साहित नसल्याचे निदर्शनात आले आहे. आदिवासी पश्चिम पट्ट्यातील आदिवासी बचाव संघटनेतर्फे जनजागृती करण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी तालुका प्रमुख गणेश गावित, जिल्हा अध्यक्ष तानाजी बहिरम, तालुका अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष मंगलदास सूर्यवंशी, महिला अध्यक्षा प्रतिभा चौरे, माजी जि. प. सदस्य योगेश चौधरी, तुकाराम बहिरम, मणीलाल गांगुर्डे यांसह संघटनेचे कार्यकर्ते प्रचार व प्रसार करीत आहेत, तसेच पश्चिम पट्ट्यातील नागरिकांनी त्वरित आपल्या परिसरातील लसीकरण केंद्रात जाऊन लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन संघटनेतर्फे केले आहे.
लसीकरणाबाबत आदिवासी संघटनेतर्फे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:30 IST