शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पथनाट्यातून कोरोनाबाबत प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 22:24 IST

नेर : जनजागृतीसाठी तरुणांनी केला अहिराणी मातृभाषेचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : गावातील तरुणांनी कोरोना महामारीबाबत अहिराणी भाषेतून पथनाट्य सादर करुन ग्रामस्थांचे प्रबोधन केले.देशात लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल झाल्याने दुकाने, सर्व व्यवसाय, वाहतूक सेवा सुरू झाले आहेत. यामुळे बाजारपेठा व अन्य वर्दळीच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. शासनाने कोरोना होऊ नये, त्यापासून स्वत:चा व इतरांचा बचाव कसा करावा, याबाबत सातत्याने जनजागृती चालवलेली आहे. परंतू तरीही काहीजण नियमांचे पालन न करता बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोनाचा शहरासह खेड्यापाड्यात मोठ्या प्रमाणात उद्रेक होत आहे.नेर ग्रामस्थांच्या प्रबोधनासाठी धुळे तालुका पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाने नेर येथील रहिवाशी व जिल्हा पोलिस दलात कार्यरत असलेले चेतन माळी, सामाजिक कार्यकर्ते भूषण भदाणे, दिलीप साळुंखे, भगवान कोळी, भावेश अहिरे, प्रमोद मगरे, योगेश सोनवणे, दिपक जाधव यांनी पथनाट्यातून कोरोनाबाबत प्रबोधनाचे कार्य हाती घेतले.गावातील गांधी चौकात पोलीस निरीक्षक दिलीप गांगुर्डे, पोलीस उपनिरीक्षक गजानन गोटे, नेर औटपोस्टचे प्रभारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण, पोलीस नाईक प्रमोद ईशी, पोलीस कॉन्स्टेबल राकेश मोरे, पोलीस पाटील रतिलाल वाघ, राजेंद्र मगरे, गोरख पगारे यांच्या उपस्थितीत पथनाट्याचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर महात्मा फुले चौक, सावता मंदिर परिसर, क्रांती चौक येथेही पथनाट्य सादरीकरण करुन जनजागृती करण्यात आली.