आॅनलाइन लोकमतधुळे :कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठ, जळगावतर्फे दिला जाणारा उत्कृष्ट राष्टÑीय सेवा योजना एकक पुरस्कार धुळ्यातील शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै.क.डॉ. पां.रा. घोगरे विज्ञान महाविद्यालय व सर्वोत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार डॉ. दत्ता ढोले यांना कुलगुरू पी.पी.पाटील यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी विद्यापीठ व्यवस्थापन समिती सदस्य दिलीप पाटील, प्रा. नितीन बारी, रा.से.यो.संचालक डॉ. पंकज नन्नावरे, केशव स्मृती प्रतिष्ठानचे रत्नाकर पाटील, प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील उपस्थित होते.राष्टÑीय सेवा योजनेत निरपेक्ष वृत्तीने सामाजिक सेवा देणारे महाविद्यालय व क्रार्यक्रम अधिकारी यांना प्रत्येकवर्षी विद्यापीठातर्फे हे पुरस्कार दिले जातात. डॉ. घोगरे विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयो एककाने स्वच्छ भारत अभियान, क्षयरोग मुक्ती, पाणी अडवा-पाणी जिरवा, डिजीटल इंडीया आदी उपक्रम राबविले आहेत. तर डॉ. दत्ता ढाले यांनीही वेगवेगळ्या सामाजिक कामांबरोबर राज्य आणि राष्टÑीय शिबिरांमध्ये विद्यार्थ्यांना सहभागासाठी तयार केले. उत्कृष्ट रासेयो पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व १ हजार रूपये रोख असे आहे. या यशाबद्दल संस्थेचे मार्गदर्शन रोहिदास पाटील, अध्यक्ष भाईदास पाटील, चेअरमन कुणाल पाटील, उपाध्यक्ष प्रफुल्ल शिसोदे, डॉ. एम.टी. पाटील, प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील यांनी कौतुक केले.