शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भजन, भारूड सादर करीत धुळे जिल्ह्यातील कलावंतांनी वेधले प्रलंबित मागण्यांकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 15:21 IST

खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळ : ५०० कलावंतांचा सहभाग

ठळक मुद्दे१ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ पर्यंतचे मानधन प्रस्तावांची छाननी करून कलावंतांच्या त्वरित मुलाखती घेऊन तत्काळ प्रस्ताव मंजूर करण्यात यावेत. शासकीय मानधनात वाढ झाली पाहिजे. प्रतीवर्षी कलावंतांचे ३०० प्रस्ताव मंजूर व्हावेत.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे  :  जिल्ह्यातील ज्या कलावंतांची मानधनासाठी निवड झाली आहे. त्यांना त्वरित मानधन सुरू करावे. यांसह अन्य मागण्यांसाठी खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात जिल्ह्यातील ५०० कलावंत सहभागी झाले होते. आंदोलनकर्त्यांनी येथे भजन व भारूड सादर करून त्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने एकतारी, भारूड, लोककलावंत, गोंधळी, वाघ्या मुरळी, जोगती, आराधी, टिंग्रीवाला व सर्व स्थानिक सांस्कृतिक कला क्षेत्रातील कलावंतांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी कलावंतांनी त्यांच्यातील उपजत कलागुणांचे येथे सादरीकरण करून त्यांचे प्रलंबित प्रश्नांवर प्रकाशझोत टाकला. 

गळवण, अभंग, लोककलांनी वेधले लक्ष प्रदेशाध्यक्ष अनिल जगताप यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजना, व्यसनमुक्ती, दारूबंदी, घर तेथे शौचालय, पाणी आडवा, पाणी जिरवा, हुंडाबंदी, बेटी बचाव, ग्रामस्वच्छता अभियान आदी विषयांवर येथे प्रबोधन केले. त्यानंतर आंदोलनात सहभागी कलावंतांनी भजन, कीर्तन, गवळण, अभंग, लोकगीते, लोककला, भारूड आदी विविध कला सादर करीत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. दुपारी जिल्हा परिषदेचे सीईओ गंगाथरन देवराजन यांना निवेदनही देण्यात आले. 

पदाधिकाºयांनी दिले आश्वासन आंदोलन सुरू असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष शिवाजी दहिते, धुळे जिल्हा कॉँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्याम सनेर व समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यांच्या समस्या जाणून घेत; त्या सोडविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करू, असे आश्वासन दिले. या वेळी प्रदेश महासचिव नानाभाऊ वाघ, प्रदेश उपाध्यक्ष फुला गवळे, जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी, तालुकाध्यक्ष संजय सोनार, पांडुरंग माळी, निंबा चौधरी, ताराचंद गवळे, शिवाजी खैरनार, जामसिंग गिरासे, मच्छिंद्र मिस्तरी, दिगंबर वाघ, राजेंद्र वाघ, मन्साराम पाटील, नाना माळी, गजू माळी, दीपक पाटील, ज्ञानेश्वर माळी, काळू पाटील आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Dhuleधुळेzpजिल्हा परिषद