शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पैसे वाटपाच्या संशयावरुन हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:16 IST

गोकर्ण सोसायटीतील घटना : लोकसंग्रामच्या कार्यकर्त्याविरुध्द गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : नकाणे रोडवरील गोकर्ण हौसिंग सोसायटीत येथील राहत्या घराच्या ओट्यावर बसून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे वाटले जात असल्याच्या संशयावरुन चार ते पाच जणांनी दोन जणांवर चाकूने हल्ला केला़ याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्यात आलेला असून मारहाण करणारे लोकसंग्रामचे असल्याचे सांगण्यात येत आहे़ शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भटू गवते व त्यांचे मित्र मनोज मधुकर पाटील हे त्यांच्या राहत्या घराच्या ओट्यावर बसलेले होते़ मात्र, हे दोघे महापालिका निवडणुकीचे पैसे वाटत आहेत असा संशय घेवून संशयित भूषण अशोक पाटील उर्फ बंटी पाटील व त्याच्या सोबत चार साथीदारांनी या दोघांवर हल्ला केला़ संशयितांनी चाकू काढून भटू गवते याच्या डोक्याच्या खाली, छातीवर दोन्ही बाजुला वार करुन दुखापत केली़ तसेच गवते यांच्या खिशातून ७०० रुपये रोख, हातातील ९ ग्रॅमची सोन्याची अंगठी बळजबरीने काढून घेतली़ मनोज मधुकर पाटील हे मध्यस्थी करण्यास गेले असता त्यांच्यावरही चाकू हल्ला करण्यात आला़ हल्ला करुन मारेकरी वाहनात बसून पळून गेले़  घटनेनंतर दोघा जखमींना तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले़ घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पश्चिम देवपूर पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, पोलीस उपनिरीक्षक एस़ के़ पाटील आदींनी रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली़ जखमींची विचारपूस केली़ याप्रकरणी भटू गवते यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन संशयित भूषण अशोक पाटील उर्फ बंटी पाटील (३४) याच्यासह चार जणांविरुध्द भादंवि कलम ३०७, ३९५, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्ह्याची नोंद झाली़ उपनिरीक्षक तिगोटे तपास करीत आहे़

टॅग्स :Dhuleधुळे