ढोलताशांच्या निनादात ‘विघ्नहर्त्या’चे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 12:50 PM2019-09-03T12:50:52+5:302019-09-03T12:51:11+5:30

सर्वत्र चैतन्याचे वातावरण : सकाळपासूनच मूर्ती खरेदीसाठी गर्दी, लाखोंची उलाढाल, मिरवणुकांमुळे उत्साहाला उधाण

Arrival of 'Disruptor' in the guise of drummers | ढोलताशांच्या निनादात ‘विघ्नहर्त्या’चे आगमन

धुळ्यातील गल्ली नंबर सहा मधील श्री राणा प्रताप मंडळातर्फे गणपतीची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी सहभागी झालेल्या महिलांनी फेटे बांधले होते. मिरवणुकीत पुरूष मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.

Next

धुळे : ढोलताशांचा निनाद... गुलाल व फुलाची उधळण  व गणपती बाप्पा मोरया.... अशा गगनभेदी घोषणा देत महाराष्टÑाचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणरायांचे सोमवारी गणेश चतुर्थीच्या महूर्तावर जल्लोषात आमगन झाले.  ‘श्री’च्या स्वागतासाठी बाजारपेठही सजली होती. घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळांमध्ये रात्री उशिरापर्यंत ‘श्रीं’च्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येत होती. गणरायाच्या आगमनानिमित्त सर्वत्र चैतन्य, उत्साह आणि आनंदाचे वातावरण निर्माण झालेले होते.
गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीनंतर यावर्षी जिल्ह्यात दमदार पाऊस झाला असून, पीक स्थिती बरोबरच पाणी टंचाईचीही समस्या सुटली आहे. सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे गणेशोत्सवाचाही सर्वत्र उत्साह आहे. 
श्रावण महिना सुरू होताच  गणरायाच्या आगमनाची चाहूल लागलेली होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून मोठ-मोठ्या सार्वजनिक मंडळांतर्फे मंडप उभारणी, आरासचे काम सुरू होते. रविवारी रात्री उशिरापर्यंत अनेक ठिकाणी मंडप उभारणीचे काम सुरू होते. सर्वांनाच प्रतीक्षा होती ती ‘श्रीं’च्या आगमनाची. 
गणरायाच्या स्वागतासाठी गेल्या दोन दिवसांपासूनच बाजारपेठ सजली होती. शहरातील विविध भागात मूर्ती विक्रेत्यांनी स्टॉल लावले होते. त्यामुळे गणेशोत्सवाची वातावरण निर्मिती झालेली होती. 
सोमवारी  सकाळपासूनच शहरासह जिल्ह्यातील प्रमुख शहरातील बाजारपेठा गजबजून गेलेल्या होत्या. जसजशी वेळ वाढत होती, तसतशी बाजारात गर्दी वाढत होती. धुळे शहरात संतोषी माता चौक ते कमलाबाई कन्या हायस्कुल पर्यंतच्या रस्त्यावर तसेच फुलवाला चौक,  जुन्या आग्रारोडवर महात्मा गांधी चौक ते पारोळा रोडवर सिग्नल चौकापर्यत रस्त्याच्या  दुतर्फा मूर्ती तसेच पूजा साहित्य विक्रेत्यांनी दुकाने थाटलेली होती. त्यामुळे या रस्त्यांवर चालायलाही जागा नव्हती. गणेश भक्तांच्या गर्दीमुळे रस्ते फुलून गेले होते. 
ढोलताशांच्या निनादाने शहर दणाणले
जुन्या आग्रारोडवर ढोलताशांची पथके सज्ज होती. गणेशमूर्तीची खरेदी होताच ती स्थापनेच्या ठिकाणी नेण्यासाठी ढोलताशांच्या निनादात लगबग सुरू व्हायची. तरूण कार्यकर्ते नृत्य करीत, तसेच गुलाल व फुलांची उधळण करत श्रींच्या मूर्तीसह मार्गस्थ होत होते.
बाजारपेठेला आले यात्रेचे स्वरूप
 मूर्ती व पूजेचे साहित्य खरिदण्यासाठी अनेकजण परिवारासह बाजारपेठेत दाखल झाल्याने, फुलवाला चौक, संतोषी माता चौक, जुना आग्रारोडला यात्रेचे स्वरूप आलेले होते. बाजारपेठेत गर्दी असली तरी गणेशभक्तांचा उत्साह तुसभरही कमी झालेला नव्हता.  या परिसरातील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले होते.
 मोठ्या मूर्तींनी लक्षवेधले  सहजीवननगरातील जयभोले मित्र मंडळसह विविध  मंडळांच्या मोठ्या मूर्ती ट्रॅक्टरवर नेण्यात आल्या. या भव्य मूर्तींनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले होते. पुरोहितांची लगबग
 अनेक ठिकाणी विधीवत पूजा करूनच श्रींची स्थापना करण्यात आली. एकेका पुरोहितांकडे अनेक मंडळाच्या श्रींच्या स्थापनेचे काम असल्याने, त्यांना धावपळ करावी लागल्याचे चित्र दिसून आले़ लाखोंची उलाढालगणेशोत्सवानिमित्त मूर्ती, आरास साहित्य, पूजा साहित्य आदींच्या खरेदीतून लाखोंची उलाढाल झाली.
पोलिस, होमगार्ड यांनी ठेवला चोख बंदोबस्त
गणपती आगमनानिमित्त अनेक मंडळांतर्फे मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस व होमगार्ड  यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कुठेही अनुचित प्रका घडला नाही. 

Web Title: Arrival of 'Disruptor' in the guise of drummers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Dhuleधुळे