कापडणे - गावातून दरवर्षी हभप मठाधिपती मेघश्याम महाराज यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर येथे पायी दिंडी जात होती. सलग दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही दिंडी रद्द करण्यात आली आहे. पंढरपूर पायी दिंडीच्या परंपरागत कार्यकमानुसार २६ जून रोजी कापडणे येथून दिंडी जाणार होती. ही परंपरा खंडित होऊ नये यासाठी शनिवारी कापडणे गावातीलच वारकरी यांनी गावातील कुलस्वामिनी जोगाई माता मंदिरापासून दिंडी काढली आणि गावातील सर्व मंदिरात अभंग भजन म्हणून अखेर गावातील धमाणे रोडवर दिंडीचा समारोप केला.
समस्त कापडणे भाविक भक्तांकडून कापडणे गावातील पंढरपूर यात्रेच्या एक दिवसाच्या पायी दिंडी सोहळ्यात महिला भाविक भक्तांनी मोठ्या हिरीरिने सहभाग घेऊन टाळ मृदुंग भजन अभंगाच्या गजरात गावातून पायी दिंडी काढली गावातील जोगाई माता मंदिरापासून दिंडीचे प्रस्थान होऊन ग्रामदेवता भवानी माता मंदिर, महादेव मंदिर, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, श्री दत्त मंदिर, श्री अन्नपूर्णा माता मंदिर, आनंदआई मंदिर, हनुमान मंदिर, श्रीकृष्ण मंदिर, श्री संतोषी माता मंदिर आदी मंदिरात दिंडीधारकांनी भेटी देऊन येथील मंदिराच्या गाभाऱ्यात भजन अभंग म्हणत वातावरण भक्तिमय व आनंदमय केले. सोबतच गेल्या १५ महिन्यांपासून भारत देशावर कोरोना महामारीचे संकट आलेले आहे. याच्यातून सर्व मानव जातीची पूर्णतः मुक्तता व्हावी. खरीप हंगामातील मोसमी पाऊस लाबल्याने शेतकऱ्यांच्या शेती शिवारात पेरणीची कामे खोळंबली आहेत, काही शेतकऱ्यांनी महागड्या बियाण्यांची लागवड केलेली आहे, मात्र पाण्याअभावी पिकांची उगवण क्षमता कमी झाल्याने बियाणे मातीतच खराब होत आहेत. यामुळे शेतकरी पूर्णत: हवालदिल झालेला आहे. या सर्व संकटातून मुक्त होण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरच्या आराध्य दैवत श्री विठ्ठल रुक्मिणीला आराधना करण्यात आली व या संकटातून मुक्त होण्याचे भाविक भक्तांनी देव-देवतांना साकडे घातले आहे.
सदर दिंडी सोहळ्यात कापडणे येथील समस्त वारकरी संप्रदायातील भाविक भक्त दिनकर पाटील, नरेंद्र पाटील, संजय पाटील, रामकृष्ण पाटील, दीपक पाटील, चुडामण बोरसे, ज्ञानेश्वर माळी, प्रदीप सोनार, अरुण पाटील, भटू पाटील, छगन पाटील, विश्वनाथ पाटील, साहेबराव माळी, महादू काकुळते, शांताराम माळी, शहाणा भाऊ माळी, रवींद्र धामणगावकर पाटील, अशोक पाटील, भगवान पाटील, विश्वास देसले, बाबुराव पाटील, मुरा अण्णा पाटील, बापू करनकाळ, दगाजी पाटील, बाळू पाटील, महिला भाविक अंजनाबाई पाटील, जयवंताबाई बिऱ्हाडे, विद्याबाई पाटील, अंजनाबाई पाटील, निर्मलाबाई पाटील, सरुबाई पाटील, भटाबाई पाटील, सुरेखाबाई पाटील, इंदूबाई पाटील आदी भाविक एक दिवसाच्या दिंडी सोहळ्यात सहभागी होते.
फोटो कॅप्शन - कापडणे गावात समस्त वारकरी संप्रदायातील भाविक भक्त श्री जोगाई माता मंदिरात पायी दिंडीचे प्रस्थान प्रसंगी टाळ-मृदंगाच्या गजरात भजन अभंग म्हणताना वारकरी.