शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
4
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
5
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
6
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
7
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
8
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
9
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
10
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
11
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
12
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
13
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
14
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
15
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
16
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
17
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
18
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
19
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
20
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?

हल्लेखोरांचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 22:34 IST

शाळकरी मुलास मारहाण : अल्पसंख्यांक महिलांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : सीएए, एनआरसी आणि एनपीएच्या विरोधात भारत बंदच्या दिवशी घडलेल्या हिंसक घटनांचे पडसाद अजुनही उमटत असून सोमवारी एका शाळकरी मुलास मारहाण झाल्याने अल्पसंख्यांक समाजातील महिलांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आणि हल्लेखोरांचा त्वरीत बंदोबस्त करण्याची मागणी केली़शंभर फुटी रोड हुडको भागातील काही महिला सोमवारी दुपारी शहरातून पायी चालत जिल्हाधिकारी कार्यालयात आल्या़ या महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर निदर्शने केली़ त्यानंतर आस्मा, शबाना, रुकसाना, जरीना, सबीना, फरजान बी, रुकसाना बी, वहीदा आणि फरजान यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेवून निवेदन दिले़निवेदनात म्हटले आहे की, २९ जानेवारीला भारत बंदच्या दरम्यान जी दगडफेक झाली, त्या घटनेचा राग मनात ठेवून सोमवारी सकाळी साडेसात वाजता अबुझर शेख (१३) हा विद्यार्थी मदरशाकडे जात असताना चाळीसगाव रोड आणि शंभर फुटीच्या रोडच्या चौकात दोन अज्ञात व्यक्तींनी त्याला मारहाण केली़ त्यांच्या हातातील दांडा आणि चाकुच्या सहाय्याने मारहाण करण्याचा प्रयत्न झाला़ त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ या लहान मुलास मारहाण करणाºया दोन व्यक्तींना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी़ तसेच अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना द्याव्यात अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे़निवासी उपजिल्हाधिकाºयांशी चर्चा करताना सदर महिलांनी पोलीस फिर्याद घेत नसल्याचा आरोप केला़ तसेच या भागात काही गुंड प्रवृत्तीचे लोक दहशत निर्माण करीत असल्याने महिला, मुलींना असुरक्षित वाटू लागले आहे़ त्यामुळे त्यांचा त्वरीत बंदोबस्त करावा़ तसेच दंगलीमध्ये ज्या निर्दोष मुलांना पोलिसांनी पकडले आहे त्यांची सुटका करावी़जिल्हाधिकाºयांनी सदर महिलांची समजूत काढताना सांगितले की, शाळकरी मुलास मारहाण करणाºयांचा शोध घेण्याच्या सूचना पोलिसांना देवून योग्य तो गुन्हा दाखल करण्यात येईल़ परंतु दगडफेक प्रकरणी ज्या तरुणांना अटक झाली आहे त्यांचा दंगलीत सहभाग असल्याचे प्राथमिक पुरावे पोलिसांकडे आहेत़ जे निर्दोष असतील त्यांच्या बाबतीत नव्याने पुराव्यांची पडताळणी केली जात आहे़ सोमवारी शाळकरी मुलास झालेली मारहाण आणि त्यानंतर अल्पसंख्यांक महिलांनी काढलेल्या मोर्चामुळे पोलिसांची काहीशी तारांबळ उडाल्याचे जाणवत होते़भारत बंदच्या दिवशी घडलेल्या हिंसक घटनांची दाहकता चाळीसगांव रोड, १०० फुटी रोडवर आजही कायम आहे़ एकीकडे संशयितांची धरपकड मोहिम जोरात सुरू असली तरी प्रशासनाचा धाक दिसत नाही़ आजची घटना त्याचेच उदाहरण म्हणावे लागेल़ गुन्हा किरकोळ वाटत असला तरी घटना गंभीर आहे़ दोन जातीय दंगलींची धग सहन केलेल्या धुळे शहरात पुन्हा काही विपरीत घडू नये यासाठी प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची आणि अधिक अलर्ट राहण्याची गरज व्यक्त होत आहे़भारत बंद दरम्यान धुळ्यात झालेल्या हिंसक आंदोलन प्रकरणी शेख समीर शेख हनीफ (२५, रा़ मुल्ला कॉलनी), असलम अब्दुल गफुर मोमीन (२२, रा़ काझी प्लर्ॉ, वडजाई रोड), मोहम्मद हसन मोहम्मद याकुब (४८, रा़ अलशबाब शाळेजवळ, मिल्लत नगर) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे़ अटकेत असलेल्या संशयितांची संख्या आता ४० झाली़ १८ ते २० जणांची नाशिक कारागृहात रवानगी झाली़

टॅग्स :Dhuleधुळे