नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांकरिता कृषी विद्यापीठाची आवश्यकता आहे असून, विद्यापीठास मंजूर देण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राहुरी येथे कृषी विद्यापीठ असल्याने त्याचा फायदा नगर जिल्ह्यातील शेतकरी, विद्यार्थी व विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना होतो. राहुरी विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या नाशिक विभागातील कर्मचारी व विद्यार्थ्यांना सावत्रपणाची वागणूक दिली जाते. त्यामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये अन्यायाची भावना आहे. मालेगाव तालुक्यांतील रावळगाव किंवा धुळे येथील कृषी महाविद्यालय येथील प्रक्षेत्र मोठे आहे. त्या ठिकाणी कृषी विद्यापीठाची स्थापना करता येईल, असे निवेदनात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनावर रवींद्र बच्छाव, रोहित पवार, दिग्वीजय पाटील, मयूर ढोडरे, माधव पाटील, पुरुषोत्तम पाठक, मधुकर पवार, प्रकाश संके, रामलाल बैसाणे, श्रावण विसाळे, भगवान मोरे, भूषण कोळी व मनोज पवार यांच्या सह्या आहेत.
नाशिक विभागासाठी कृषी विद्यापीठ मंजूर करा : कन्हैयालाल ढोडरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:38 IST