तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींची ५६० जागेसाठी पंचवार्षिक निवडणूक होती त्यात १५ ग्रां.प.च्या १८० जागा या बिनविरोध झाल्या होत्या, त्यात ४८ ग्रामपंचायत ३८० जागेसाठी च्या निवडणूक १५ तारखेला मतदान झाले त्याची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजता तहसील कचेरीत तीन फेरीत १६ टेबल वर त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र टेबल राहणार आहे. यात पहिल्या फेरीत ,सोनेवाडी, दरखेडा, सोनशेलू, विखुर्ले, सारवे, हातनूर, दत्ताने, निरगुडी, अमराळे, लोहगाव वसमाणे, लंघाणे, पढावद, तावखेडा प्र. न., विरदेल, डाबली, सुराय ग्रुप, या सोळा गामपंचायतींची मतमोजणी होणार आहे.
दुसऱ्या फेरीत रहिमपुरे,खलाने, वरूळ घुसरे, धमाणे, सवाईमुकटी, बाह्मणे, अंजदे खु, तामथरे, जसाने, अजंदे बु, जुने कोळदे, कर्ले, झिरवे, दलवाडे प्र न , बेटावद, चिमठावळ या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
तिसऱ्या फेरीत कामपूर, जातोडे, रेवाडी, वायपूर, जखाने, सुलवाडे, सुकवद, डांगुणें-सोडले, रंजाने, नवे कोळदे, परसोळे, धावडे, मुडावद, भिलाने दिगर,अक्कडसे, मेलाने या सोळा ग्रामपंचायतींची मतमोजणी होणार आहे.