शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

धुळे जिल्ह्यात कर्जमाफीचा लाभ न मिळालेल्या शेतक-यांच्या अर्जांची पडताळणी सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:17 IST

प्रतीक्षा : जिल्ह्यातील राष्टÑीयकृत बॅँकेच्या ७ हजार १९१ शेतकºयांना लाभ

ठळक मुद्देकर्जमाफीसाठी अर्ज करणा-या शेतक-यांपैकी २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत. त्यांच्या खात्यात ६८ कोटी ७२ लाख १६ हजार ९४६ इतकी रक्कम जमा झाली. उर्वरीत ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे आहे. त्या शेतकºयांच्या खात्यात कर्जमाफीची ५० कोटी २२ लाख रुपये रक्कम जमा केली आहे. दरम्यान, कर्जमाफीसाठी अर्ज करणा-या ज्या शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ झालेला नाही; अशा शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी सुरू असून अर्ज पडताळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क धुळे :  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी १८ जानेवारीपर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार २०२ शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. तर उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत समितीमार्फत सुरू आहे. अर्ज पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरीत पात्र शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. दरम्यान, कर्जमाफीचा लाभ घेणाºया शेतकºयांपैकी  २५ हजार ११ शेतकरी हे धुळे व नंदुरबार जिल्हा बॅँकेचे कर्जदार आहेत; तर ७ हजार १९१ शेतकरी हे राष्टÑीयकृत बॅँकेचे शेतकरी आहेत. राज्य शासनाने शेतकºयांसाठी  छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. या योजनेंतर्गत १ एप्रिल २००९ ते ३० जून २०१६ अखेर थकबाकदीदार शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी व दीड लाख रुपयांवरील शेतकºयांना एकवेळ समझोता योजना लागू केली होती. तसेच २०१५-२०१६, २०१६-२०१७ वर्षात ज्या शेतकºयांनी कर्जाची नियमित परतफेड केली, अशा शेतकºयांना २५ टक्के किंवा २५ हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचे घोषीत केले होते. २००९- २०१० ते २०१५-२०१६ या कालावधित कर्जाचे पुनर्गठण केलेल्या शेतकºयांपैकी जे शेतकरी ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असतील. त्यांना या वरील योजनेचा लाभ देण्याचे जाहीर केले होते. 

५५ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत राज्य शासनाने कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर  जिल्ह्यात ८७ हजार ७०५ शेतकºयांनी अर्ज भरले होते. पैकी ५५ हजार ५०३ शेतकºयांनी अर्ज करूनही त्यांना आतापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत केवळ ३२ हजार २०२ शेतकºयांच्या बॅँक खात्यात ११७ कोटी ९४ लाख १६ हजार ९४६ रुपयांची कर्जमाफीची रक्कम जमा झाली आहे. उर्वरीत शेतकºयांच्या अर्जांमध्ये तांत्रिक त्रुटी आढळून आल्यामुळे या अर्जांची पडताळणी तालुकास्तरीय गठीत केलेल्या समितीतर्फे सुरू आहे. या समितीने आतापर्यंत अनेक अर्ज रद्द ठरविल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, समितीने  नेमके किती अर्ज रद्द ठरविले? याची अधिकृत माहिती प्रशासनाकडे अद्याप प्राप्त झालेली नाही.