शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अनेर, सुलवाडे बॅरेजमधून विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 21:14 IST

पाटबंधारे विभाग : दोन प्रकल्प १०० टक्के भरले, करवंद, बुराई ओव्हरफ्लो

धुळे : गेल्या आठवड्यापासून धुळे जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी जुलै महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे धुळे जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये पाणीसाठा वाढत आहे़जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने तापीची पातळी वाढली आहे़ त्यामुळे सुलवाडे बॅरेजचे आठ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत़ तसेच अनेर प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत़ या प्रकल्पांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात जलसाठ्यामध्ये घट झाल्याची नोंद करण्यात आली आहे़अनेर प्रकल्पात २६ जुलैपर्यंत १५.१८ दशलक्ष घनमीटर जलसाठा होता़ त्यात घट होवून २ आॅगस्टला १४.१८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे़सुलवाडे बॅरेजमध्ये गेल्या आठवड्यात म्हणजे २६ जुलैला ३३.६३ टक्के जलसाठा होता़ आता २ आॅगस्टला सुलवाडे बॅरेजमध्ये २८.८३ टक्के पाणीसाठा आहे़ जल पातळीसह साठ्यातही घट झाली आहे़ पाण्याचा विसर्ग सुरूच आहे़दरम्यान, मुकटी आणि कनोली हे दोन प्रकल्प पूर्ण क्षमतेने म्हणजे १०० टक्के गेल्या महिन्यातच भरले आहेत़ करवंद आणि बुराई प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत़ याशिवाय नकाणे, डेडरगाव यांसारखे लघु प्रकल्प देखील ओव्हरफ्लो झाले आहेत़ इतर मध्यम प्रकल्पांमध्ये अजुनही समाधानकारक जलसाठा झालेला नाही़ अशा स्थितीत गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे़मालनगाव, अक्कलपाडा आणि सोनवद प्रकल्पाची पाणीपातळी आणि जलसाठा गेल्या आठवड्याच्या तुलनेत वाढला आहे़

टॅग्स :Dhuleधुळे