शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

धुळे : क्षुल्लक कारणावरून प्रौढाला जबर मारहाण, धुळ्यातील साक्री रोडवरील घटना

By देवेंद्र पाठक | Updated: April 29, 2023 18:16 IST

ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धुळे : क्षुल्लक कारणावरून प्रौढाला लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना साक्री रोडवरील मोतीनाला भागात गुरुवारी सकाळी घडली. जखमी झालेल्या इसमाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.

साक्री रोडवरील मोगलाईतील जाळीच्या पुलाजवळ राहणारा ऋषिकेश दिनेश देवरे (वय २२) या तरुणाने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, रस्त्यावर कुत्रा का बांधला असे विचारल्याचा राग आल्याने वडील दिनेश रमण देवरे (वय ५५) यांना शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. ही घटना साक्री रोडवरील विकास कॉलनीजवळील मोतीनाला येथे गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजता घडली. एवढेच नव्हेतर तुझ्यासह घरच्या सदस्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली. शिवीगाळसह मारहाण केल्यानंतर चार जणांनी घटनास्थळावरून पळ काढला.

ही घटना लक्षात येताच त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी जखमी दिनेश देवरे यांचा मुलगा ऋषिकेश देवरे यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार, शुक्रवारी सायंकाळी पावणेसहा वाजता विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस हेड कॉन्स्टेबल वसावे घटनेचा तपास करत आहे.