शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कांदा व कपाशीला भाव मिळावा यासाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 22:25 IST

शेतकरी संघटना : कांद्याला २००० हजार तर कपाशीला ५५५० हमी भाव देण्याची मागणी, आंदोलनादरम्यान राखले फिजिकल डिस्टन्स

पिंपळनेर :कांद्याला २००० तर कपाशीला ५५५० हमीभाव मिळावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकरी संघटनेतर्फे आंदोलन करण्यात आले. काहीठिकाणी मूठभर कापसाची होळी करण्यात आली.पिंपळनेरदेशशिरवाडे येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय येथे कापूस व कांदा आंदोलन करण्यात आले. कांद्याला २००० रुपये, तर कपाशीला ५५५० रुपये हमीभाव मिळावा यासाठी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शशिकांत भदाणे, यांच्या नेतृत्वाखाली सरपंच निलेश पगारे, दादाजी सोनवणे, रामदास कोठावदे, हरिभाऊ कोठावदे, विजय पगारे, रघुनाथ सोनवणे, बळवंत कोठावदे, सुधाकर सोनवणे, गोविंद गवळी, भगवान गवळी, सुरेश शिंदे, मनीष पगारे, रमाकांत सोनवणे आदींनी केले. आंदोलन करतांना फिजिकल डिस्टन्स ठेवण्यात आले होते. तसेच राज्य शासनाला जाग यावी यासाठी कापूस मूठभर कापूस जाळण्यात आले.लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कांदा निर्यात खुली करावी, शेतकऱ्यांना जास्तीचे पैसे मिळावे यासाठी राज्य सरकारने शेतकºयांच्या कांदा संदर्भात त्वरित निर्णय घेऊन त्यांच्या हिताचा विचार करावा यासाठी आंदोलन केले. तालुक्यात उभर्टी, शेणपूर, देगाव, प्रतापपूर गावात शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.कापडणेकापुस खरेदी बाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने कापूस जाळा आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वाजता झेंडा चौकात हे आंदोलन झाले. केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा आवश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळला असला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. मात्र अडचणीत असलेल्या शेतकºयांना सावरण्यासाठी शासनाने काहीच केले नाही. नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा,अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकºयांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन कापुस जाळण्याचे आंदोलन केले. लॉकडाउनचे सर्व नियम पाळुन करण्यात आले. कापडणे येथे झालेल्या कापूस जाळा आंदोलन प्रसंगी आत्माराम पाटील ,नारायण माळी, रवींद्र वाणी सुमनबाई माळी ,विकास पाटील आदी उपस्थित होते .

टॅग्स :Dhuleधुळे