शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

मनोमिलनाच्या घोषणेनंतरही प्रश्न अनुत्तरीत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 23:03 IST

डॉ.सुभाष भामरे व अनिल गोटे एका व्यासपीठावर दिसणार का : राष्टÑवादीतून भाजपमध्ये आलेल्यांचे भवितव्य काय?

ठळक मुद्देराष्ट्रवादीतून आलेल्याचे काय ?  जे निवडून येऊ शकतात, अशा राष्टÑवादीतून भाजपमध्ये प्रवेश दिलेल्या उमेदवारांचे भवितव्य काय राहणार. कारण आमदार गोटे त्यांच्यातील अनेकांच्या प्रवेशावर नाराज होते. ते त्यांचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांचे भाजपमधील भवितव्य काप्रभारी गिरीश महाजनांची भूमिका आमदार अनिल गोटे यांनी स्पष्ट म्हटले आहे की, महापालिका त्यांच्या नेतृत्वाखाली लढविण्यास मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे. मग पक्षाचे प्रभारी गिरीश महाजन यांची भूमिका काय राहणार, हाही एक प्रश्नच आहे.७०-३० चा फॉर्म्युला वापरणार का आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यात जर दिलजमाई झाली तर मग सुरुवातीला चर्चेत असणाºया ७०-३० या फॉर्म्युल्याप्रमाणे जागा वाटप होणार, की नवीन कोणता फॉर्मुला वापरला जाणार, याबाबत चर्चा सुरु झा

राजेंद्र शर्मा। लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्या गटात गेल्या दोन महिन्यांपासून रंगत चाललेला सामना रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेमुळे अर्निणीत राहणार असल्याचे चित्र आहे. आणि सोमवारी रात्री मुंबईत पक्षश्रेष्ठी आणि आमदार गोटे यांच्यातील बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्याप्रमाणे जर सर्वकाही तसेच घडले. तर  एकमेकांवर वैयक्तिक पातळीवर टीका करणारे भाजपचे हे नेते पुन्हा एक व्यासपीठावर येणार का, तसेच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या लोकांचे भवितव्य आता काय राहणार, त्यांना जर भाजपने तिकिट नाकारले तर ते बंडखोरी करणार का, त्यांचे भवितव्य काय असणार, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. धुळे महानगरपालिका निवडणुकीत  सध्या शहरात भाजपामधील दोन समांतर  गटांचे प्रचार कार्यालय कार्यरत आहेत. एका प्रचार कार्यालयाचे उद्घाटन आमदार अनिल गोटे यांनी केले तर दुसºया कार्यालयाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे. दोन्ही प्रचार कार्यालयात १९ प्रभागातील ७४ जागांसाठी इच्छुक उमेदवारांच्या स्वतंत्र मुलाखतीसुद्धा झाल्या आहेत. महापालिका निवडणुकीसाठी आयोजित प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारसभेतील गोंधळ नंतर दुसºया दिवशी आमदार गोटे यांनी महापौर पदासाठी जाहीर केलेली आपली उमेदवारी अणि आमदार पदाचा राजीनामा देण्याची घोषणा, त्यानंतर  गेल्या आठवडयात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यात पत्रकार परिषदेतून रंगलेला कलगीतुरा या घटना ताज्या आहेत. त्यातच रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली की, आमदार अनिल गोटे आमदारकीचा राजीनामा देणार नसून ते महापालिका निवडणुकीत पक्षाचा प्रचार करतील. या घोषणेनंतर महापालिका निवडणुकीचे राजकीय गणितच बदलले आहे. कारण आमदार अनिल गोटे यांच्याकडे जर महापालिका निवडणुकीची धुरा गेली तर मग प्रचारासाठी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, भाजपचे महापालिका निवडणूक प्रभारी गिरीश महाजन, रोहयो मंत्री जयकुमार रावल हे एका व्यासपीठावर येतील का, असा सवाल निर्माण होत आहे. कारण डॉ.भामरे आणि गोटे या दोन्ही गटांकडून एकमेकांवर झालेल्या आरोप- प्रत्यारोपानंतर ते कसे शक्य होणार, हाही एक प्रश्नच आहे. कारण ज्यांच्या सभाच एकमेकांवर आरोप करण्यामुळे गाजत होत्या. त्यांना आता बोलण्यासाठी कोणता विषय राहिल. काय सांगतील एकमेकांबद्दल, ते लोकांना कुठपर्यंत रुचेल. पक्षातील कार्यकर्त्यांनाही ते मान्य होईल का, हे सर्वप्रश्न आजतरी अनुत्तरीत आहे. पण म्हणतात ना की, राजकारणात काहीही अशक्य नसते, त्यामुळे हे सर्व पुन्हा एका व्यासपीठावर येणेही अशक्य नाही. पण याचा परिणाम महापालिका निवडणुकीत पॉझीटीव्ह होतो की निगेटीव्ह ते महापालिका निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. एवढे मात्र, निश्चित आहे की, बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर निश्चितच दिसून येणार आहे.

टॅग्स :DhuleधुळेPoliceपोलिस