शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल २० वर्षानंतर चोरलेले सोने, चांदीचे दागिने परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 23:01 IST

अग्रवाल नगरातील घटना : न्यायालयीन आदेशानंतर अंमलबजावणी

धुळे : मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरात टाकण्यात आलेल्या दरोडा प्रकरणातील मुद्देमाल आझादनगर पोलिसांनी जप्त केला़ त्यात ३४़५० ग्रॅम सोने आणि ७५० ग्रॅम चांदीचा असा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधितांना परत करण्यात आला़ दरम्यान, दागिने परत मिळाल्यामुळे नारायण अग्रवाल यांनी आझादनगर पोलिसांचे आभार व्यक्त केले़शहरातील मालेगाव रोडवरील अग्रवाल नगरात नारायण मदनलाल अग्रवाल यांचे निवासस्थान आहे़ ते कुठेतरी बाहेर गावी गेल्यामुळे त्यांच्या घराला कुलूप होते़ चोरट्याने ही संधी साधून त्यांचे घर फोडले होते़ ही घटना तब्बल २० वर्षापुर्वी घडली होती़ याप्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता़ गुन्हा दाखल झाल्यानंतर आझादनगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित गुन्ह्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशीअंती अटक केले होते़ त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर मिळालेल्या पोलीस कोठडीत त्यांना पोलीसी खाक्या दाखविण्यात आला़ त्यांनी गुन्ह्याची कबुली देत ३४़५० ग्रॅम वजनाचे सोने आणि ७५० ग्रॅम वजनाची चांदीची लगड असा मुद्देमाल आझादनगर पोलिसांनी जप्त केला होता़ याप्रकरणी न्यायालयीन कामकाज सुरु असल्यामुळे हा मुद्देमाल पोलिसांकडे सुरक्षितपणे होता़पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी मुद्देमाल निर्गती करण्याच्या सूचना आझादनगर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिल्या होत्या़ त्यानुसार न्यायालयात पाठपुरावा करण्यात आला़ परिणामी न्यायालयाच्या आदेशानुसार नारायण मदनलाल अग्रवाल (रा़ अग्रवाल नगर, धुळे) यांच्याकडे हा मुद्देमाल सुपुर्द करण्यात आला़ यावेळी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, पोलीस कर्मचारी दगडू कोळी, चेतन सोनवणे उपस्थित होते़

टॅग्स :Dhuleधुळे