शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
2
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
3
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
4
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
5
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
6
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
7
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
8
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
9
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
10
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
11
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
12
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
13
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."
14
जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज
15
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
16
मेट्रोचे सर्व टप्पे २०२६च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरता खुले होतील- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
17
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
18
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
19
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
20
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?

१० वर्षानंतर बुराईला पूर, पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 11:25 IST

परतीचा पाऊस : म्हसाळे गाव परिसरात घरांची पडझड, लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देम्हसाळे गावात घरांची पडझड झाली आहे. शिंदखेडा शहरातील नदीच्या काठावर राहणाºया लोकांना सर्तकतेचा इशारा ॅपावसामुळे पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : जिल्ह्यात मंगळवारी रात्री    १९२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. परतीच्या पावसामुळे माळमाथ्यावर म्हसाळे गावात घरांची पडझड झाली आहे. तसेच बाजरी, मका आणि कापूस पिकाचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे.  पांझरा आणि बुराई नदीला पूर आला आहे. शिंदखेडा शहरातील नदीच्या काठावर राहणाºया लोकांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.जिल्ह्यात मंगळवारी रात्री जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे माळमाथ्यावरील म्हसाळे गावात घरांची पडझड झाली आहे.बळसाणे - साक्री तालुक्यातील म्हसाळे गावातील कृष्णा नथ्थू ईशी  यांच्या मातीचे घराचे छत्त कोसळले. त्यात संसारोपयोगी साहित्य  आणि अन्य सर्वच वस्तु त्याखाली दाबल्या गेल्या आहेत.   कृष्णा ईशी यांच्या मुलीचे  ३ नोव्हेंबरला लग्न असल्याने  त्यासाठी केलेली सर्व खरेदीच्या वस्तुही त्यात गेल्या आहेत. त्यामुळे ईशी कुटुंबिय रस्त्यावर आले आहे.याशिवाय गावातील गिरधर माणिक कोळी, विलास भिकनराव पाटील, किशोर  गिरधर ठाकर, जितेंद्र देविदास बोरसे, लटकनबाई सोनवणे, अमृत पारधी , शालीग्राम चव्हाण  यांच्या घरांचीही पडझड झाली आहे. बळसाणे येथील शिवसेना उपविभाग प्रमुख व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य महावीर जैन यांनी गावास  भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. नुकसानीचे पंचनामे करून त्यांना लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी मसाले ग्रामस्थ महावीर जैन , वना जाधव , महेंद्र निकुंभे , प्रशांत माळी , योगेश कोळी , परेश जैन , दादा पाटील , चेतन गिरासे , ईश्वर खैरनार यांनी केली आहे.माळमाथ्यावर बळसाणे, म्हसाळे,  छाडवी गावात मंगळवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. सुमारे दोन ते अडीच तासापर्यंत पाऊस झाला.शिंदखेडा -  परतीच्या पावसाच्या धुळे तालुक्यातील लामकानी, बोरिस, निकुंभे आदी परिसरात जोरदार  पाऊस झाल्याने बुराई नदीची उपनदी पान नदीला पूर आला. पुराचे पाणी  बुराई नदीत आल्याने बुराईला मोठा पूर आला आहे.  त्यामुळे नदीकाठावर राहणाºया नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.शिंदखेडा येथील बंधारा चिरणे रस्त्याकडील भाग पावसाने मातीचा भराव खचल्याने येथून बंधारा फुटण्याच्या बेतात होता मात्र धुळे येथील पाटबंधारे विभागाचे अभियंता महाजन व चिमठाणे येथील पाट कर्मचारी यांनी लागलीच जेसीबीच्या साहयाने बुजला म्हणून पुढील अनर्थ              टळला.  धुळे तालुक्यात लामकानी परिसरात  रात्री पाऊस झाल्याने पान नदीला पूर आला. पान नदी ही बेहेड येथे बुराई ला मिळते. त्यामुळे  बुराईला मोठा पूर आला आहे. याआधी सन २००६ मध्ये   बुराई  नदीला पूर आला होता. त्यानंतर १० वर्षानंतर बुराईला असा मोठा                  पूर आला आहे.  त्यामुळे नदीकाठावरील गावातील  नागरिकांनी नदीकाठी एकच गर्दी केली होती. गेल्या चार दिवसापासून होत असरलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे  बुराई नदीला मोठा पूर आला आहे. त्यामुळे शहरातील गाव दरवाज्याजवळ राहत असलेल्या नागरीकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. रात्रीतून नदीचे पाणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने  नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.ॅॅ