शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यात ११ वीसाठी २२ जून पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 11:47 IST

सर्व व्यवस्थापनाच्या २५ हजार ६०० जागा, पहिली यादी २९ रोजी लागणार

ठळक मुद्दे२२ पासून प्रवेश अर्ज वितरणास सुरवात२९ रोजी पहिली यादी जाहीर होणारप्रवेश प्रक्रिया ९ जुलैपर्यंत सुरू राहणार

आॅनलाइन लोकमतधुळे : इयत्ता ११ वीसाठी प्रवेश प्रक्रिया येत्या २२ जून पासून सुरू होणार आहे. जिल्ह्यात अनुदानित, विनाअनुदानित स्वयंअर्थसहाय्यित अशा सर्व व्यवस्थापनाच्या कनिष्ठ महाविद्यालयात कला, वाणिज्य व विज्ञान शाखेच्या एकूण २५ हजार ६०० जागा आहेत. प्रवेशाची पहिली यादी २९ जून रोजी लागणार आहे. दहावीचा नुकताच निकाल जाहीर झालेला आहे. जिल्हयातील  ६३ केंद्रावर एकूण २९ हजार ९८ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २५ हजार ४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची टक्केवारी ८७.५१ टक्के एवढी आहे.दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांना ११वीच्या प्रवेशाचे वेध लागले आहेत. शिक्षण उपसंचालक नाशिक यांनी ११वीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. जिल्हयातील धुळे शहर, ग्रामीण,साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात सर्व व्यवस्थापनाच्या कला शाखेच्या एकूण प्रवेश क्षमता १३ हजार २४० आहे. तर विज्ञानाची प्रवेश क्षमता १० हजार ८०, वाणिज्य शाखेची १ हजार ४०, संयुक्त १ हजार २४० अशा एकूण २५ हजार ६०० जागा आहेत.  जिल्ह्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचीत राहणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे पत्रात नमूद केले आहे.कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना प्रवेश अर्ज २२ ते २६ जून दरम्यान वितरीत करायचे आहेत. २९ रोजी संवर्गनिहाय अर्जाची छाननी करण्यात येईल.  त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सवंर्गनिहाय पहिली गुणवत्ता व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे.३ जुलै १८ पर्यंत पहिल्या गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.  त्यानंतर दुसरी व तिसरी प्रवेश यादी जाहीर करण्यात येणार आहे.ही प्रवेश प्रक्रिया ९ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. १६ जुलै रोजी प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही राहिलेल्या जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे.जिल्ह्याच्या मुख्यालयी तसेच जेथे जादा कनिष्ठ महाविद्यालये आहेत, तेथे एक मार्गदर्शन केंद्र उघडून ज्यांना प्रवेश मिळालेला नाही, त्यांना रिक्त जागा कोणत्या कनिष्ठ महाविद्यालयात आहे, याची माहिती द्यावी असेही पत्रात नमूद केलेले आहे.  

टॅग्स :Dhuleधुळेeducationशैक्षणिक