शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

फेरमूल्यांकनाचा आदेशानंतर प्रशासकीय यंत्रणा गतिमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 15:55 IST

जिल्हा प्रशासन : अधिका-यांनी केली कागदपत्रांची पडताळणी

ठळक मुद्देऔष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी शिंदखेडा तालुक्यातील विखरण व मेथी शिवारात भूसंपादन झालेल्या शेत जमिनीच्या कागदपत्रांच्या पडताळीस सोमवारी सकाळी साडे आठ वाजेपासून जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी तपासणीस सुरुवात केली. ही तपासणी उपजिल्हाधिकारी प्रकाश चौबळ यांच्या दालनात सुरू होती. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर, उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे (म.पा.प्र) आदी उपस्थित होते. दुपारी अडीच वाजेपर्यंत ही तपासणी सुरू होती.

 लोकमत न्यूज नेटवर्क

धुळे :  शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा मंगा पाटील (८०) यांच्या निधनानंतर शासनाने औष्णीक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादीत केलेली १९९ हेक्टर जमिनीच्या फेरमूल्यांकनाचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ करत प्रशासकीय पातळीवरील यंत्रणा गतिमान झाली. त्यानुसार विखरण, मेथी (ता.शिंदखेडा) येथे संपादीत केलेल्या जमिनींच्या  कागदपत्रांची पडताळणी अधिकाºयांनी केली. त्याचा अहवाल मंगळवारी शासनाकडे पाठविण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी दिली.  विखरण येथील प्रकल्पग्रस्त शेतकरी धर्मा मंगा पाटील (८०) यांची औष्णीक ऊर्जा प्रकल्पासाठी गट क्रमांक २९१/१, २९१/२ ही जमीन संपादीत करण्यात आली होती. परंतु, त्यासाठी त्यांना अगदी तुटपुंजे पैसे देण्यात आले. त्यामुळे धर्मा पाटील हताश होते. त्यानुसार त्यांनी प्रशासकीय व  शासनस्तरावर न्याय मागण्यासाठी अनेकदा पाठपुरावाही केला होता. परंतु, दखल घेतली जात नसल्यामुळे गेल्या सोमवारी त्यांनी मुंबईत मंत्रालयात जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला होता. 

३० दिवसात कार्यवाही; योग्य मोबदला देण्याचे आश्वासन धर्मा पाटील यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा नरेंद्र पाटील यांनी न्याय मिळाल्याशिवाय पार्थिव उचलणार नाही; असा पवित्रा घेतला होता. त्यापार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना लेखी पत्र दिले. त्यात औष्णीक प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या १९९ हेक्टर क्षेत्र जमीनीचे फेरमूल्यांकन करून या प्रकरणाची पुढील ३० दिवासत कार्यवाही करण्यात येईल. तसेच याप्रकरणी शासनाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार योग्य तो मोबदला देण्यात येईल; असे म्हटले आहे. 

शासन आदेशानुसार औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी भूसंपादीत केलेल्या कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. त्याचा अहवाल शासनाकडे पाठविणार आहोत.    - डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी