शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

धुळे जिल्ह्यातील विस्थापित शिक्षकांचे समायोजन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 11:41 IST

शैक्षणिक वर्ष सुरू होऊनही शिक्षण विभागाकडून समायोजनाकडे दुर्लक्ष

ठळक मुद्देजिल्ह्यात ३५० शिक्षकांच्या बदल्याबदली प्रक्रियेत ५५ शिक्षक विस्थापितआंतरजिल्हा बदलीने ६३ शिक्षक जिल्ह्यात आले

आॅनलाइन लोकमतधुळे : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या नुकत्याच आॅनलाइन बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये जिल्ह्यातील ५५ शिक्षक विस्थापित झालेले आहेत. त्याचबरोबर आंतरजिल्हा बदलीने ६३ शिक्षक जिल्ह्यात आलेले आहेत. शाळा सुरू झाल्या तरी शिक्षकांचे अद्याप समायोजन झालेले नाही.शनिवारी जिल्ह्यातील ३५० प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्राथमिक शिक्षण विभागातर्फे पारित केले. यात धुळे तालुक्यातील ६४, साक्री तालुक्यातील १५०, शिंदखेडा तालुक्यातील ५७ व शिरपूर तालुक्यातील ७९ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. यात संवर्ग १च्या ८१, संवर्ग-२च्या ५७, संवर्ग ३च्या चार, व संवर्ग४ मध्ये २०८ शिक्षकांच्या बदल्या झालेल्या आहेत. बदली प्रक्रिया पारदर्शकपद्धतीने पार पडली असली तरी, यात जवळपास ५५ शिक्षक विस्थापित झालेले आहेत. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या त्यांना त्याच दिवशी कार्यमुक्ततेचे आदेश देण्यात आले. बदली झालेले शिक्षक नवीन शाळेत सोमवारपासून रूजू झालेले आहेत. बदली होऊन आलेले व विस्थापित झालेले शिक्षक दोघेही एकाच शाळेवर कार्यरत आहेत.विस्थापितांचा प्रश्न अद्याप सुटलेला नसतांना आंतरजिल्हा बदलीने बाहेरच्या जिल्ह्यातून ६३ नवीन शिक्षक जिल्ह्यात आलेले आहे. त्यामुळे विस्थापित व आंतरजिल्हा बदलीने आलेले अशा एकूण ११६ शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. जोपर्यंत विस्थापितांचे समायोजन होत नाही, तोपर्यंत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना शाळा देता येणार नाही असे शिक्षक संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे आता हा प्रश्न कसा सुटणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.पदवीधरांच्या जागेवर समायोजन करावेदरम्यान विस्थापितांच्या संदर्भात जिल्हा प्राथमिक शिक्षक समितीने नुकतीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरन डी. यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात २८ मे २०१९ च्या शासन निर्णयानुसार विशेष संवर्ग २ व ४ मधील विस्थापित शिक्षकांना समुपदेशनाने समानीकरणाच्या रिक्त जागेवर अथवा विषय शिक्षकांच्या रिक्त जागेवर पदस्थापना द्यावी अशी मागणी केलेली आहे.धुळे तालुक्यात २३ शिक्षक विस्थापित झालेले आहेत. त्यापैकी तालुक्यात २२ पदवीधरांच्या जागा रिक्त असून, त्या जागी विस्थापित शिक्षकांचे समायोजन करण्यात येईल असे आश्वासन सीईओंनी दिल्याचे शिक्षक समितीचे म्हणणे आहे.निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, बापू पारधी, विश्वनाथ सोमवंशी, विक्रम पाटील, रमेश पाटील, आनंद होलारे, भटू पाटील, योगेंद्र झाल्टे, सुनील वारे, देवीदास पाटील आदींची नावे आहेत. 

 

 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण