शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

धुळ्यात कृषी विद्यापीठासाठी कृती समितीतर्फे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 16:04 IST

शासनाने नेमलेल्या डॉ.थोरात, डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची अमलबजावणी करावी

ठळक मुद्देजिल्ह्यातील २०० ग्रामसभांनी कृषी विद्यापीठासाठी केला आहे ठरावअर्थसंकल्पीय अधिवेशात कृषी विद्यापीठाची घोषणा करावीकोरडवाहू विभागाकरिता वेगळे कृषीविद्यापीठ आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे विभाजन करून नियोजित कृषी विद्यापीठ धुळ्यात झाले पाहिजे यासाठी कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीतर्फे नववर्षाच्या पहिल्या दिवशी ‘स्मरण धरणे आंदोलन’ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. त्याचबरोबर शासनाने नेमलेल्या डॉ. एस.वाय.थोरात व डॉ. व्यंकटेश्वरलू समितीच्या अहवालाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशी मागणी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली.धरणे आंदोलनाचे नेतृत्व माजी आमदार तथा कृषी विद्यापीठ निर्माण कृती समितीचे निमंत्रक प्रा.शरद पाटील यांनी केले होते.निवेदनात म्हटले आहे की, १९६० मध्ये धुळ्यात कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात आले. त्यावेळी संभाव्य कृषी विद्यापीठ धुळ्यात होणे अपेक्षित होते. १९६३-६४ मध्ये धुळे जिल्ह्यात कृषी विद्यापीठ स्थापनेसाठी अनुकूल वातावरण असतांना राहूरी येथे कृषी विद्यापीठ स्थापन करण्यात आले. राज्यातील दोन कृषी विद्यापीठांचे विभाजन करून, नवीन विद्यापीठ निर्माण करण्यााठी शासनाने डॉ. व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल शासनाला सादर झाला आहे. यात ज्या ठिकारी कृषी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी पुरक वातावरण आहे, अशाच ठिकाणी विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असा समितीचा अहवाल आहे. त्यात धुळ्याचे नाक प्राधान्यक्रमावर आहे.गेल्या २१ जानेवारी १६ रोजी सर्व महाविद्यालये बंद ठेवून विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून मागणी तीव्र असल्याचे दर्शवून दिले. तर जिल्ह्यातील २०० ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव करून, कृषी विद्यापीठ धुळ्यात होण्याची एकमुखी मागणी केली आहे.आघाडी व युती शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या अहवालात धुळ्याचे नाव अग्रक्रमावर आहे. या दोन्ही अहवालांची अंमलबजावणी करून, धुळे जिल्ह्यात लवकरात लवकर कृषी विद्यापीठ स्थापन करावे, येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नवीन कृषी विद्यापीठाची घोषणा व्हावी, अशी मागणी केली.राहुरी कृषी विद्यापीठाचे कार्यक्षेत्र मोठे आहे. धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे लक्ष नाही. विद्यापीठाचे मुख्य लक्ष राहुरी, पुणे, कोल्हापूरकडे आहे. यामुळे या विभागाचा विकास झालेला नाही. म्हणून खान्देश विभागाकरीता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे.खान्देशातील धुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्याचा बराच भाग कोरडवाहू आहे. त्यामुळे कोरडवाहू विभागाकरिता वेगळे कृषी विद्यापीठ आवश्यक आहे असेही निवेदनात म्हटले आह.यावेळी अतुल सोनवणे, धीरज पाटील, भुपेंद्र लहामगे, यशवर्धन कदमबांडे, नाना कदम, पंकज गोरे, साहेबराव देसाई, डॉ. संजय पाटील, कमलेश भामरे आदी उपस्थित होते.