शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी संख्येनुसार धुळे जिल्ह्यातील जि.प.शाळांना गणवेशाचा निधी द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 11:19 IST

महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची शिक्षणाधिकाऱ्यांकडे मागणी

ठळक मुद्देॅनिधी कमी मिळाल्याचे संघटनेचे म्हणणेशिक्षकांचे पगार दर महिन्याच्या एक तारखेलाच व्हावे

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळांना विद्यार्थी संख्येनुसार गणवेशाची रक्कम वितरीत करण्यात यावी, अशी मागणी महाराष्टÑ पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की, २०१८- १९ पासून शाळांना समग्र शिक्षा अभियानांतर्गत निधी मिळतो. २०१७-१८ पर्यंतचा शाळा स्तरावरील सर्व शिल्लक निधी ३१ मार्च १९ पूर्वी खर्च करावा असे कळविल्याने, शाळांनी कार्यवाही केली. मात्र २०१९-२० या वर्षाकरिता संयुक्त शाळा अनुदानांतर्गत कोणतेही अनुदान शाळेला मिळालेले नाही. चालू सत्रातील अनुदान एप्रिलमध्ये प्राप्त होत नसल्याने, शाळा आधीच्या सत्रात प्राप्त अनुदान हे चालू सत्राच्या संभाव्य खर्चाकरीता शिल्लक ठेवते. शाळेचा खर्च हा सन २०१८-१९ मध्ये प्राप्त संयुक्त शाळा अनुदानातील शिल्लक रकमेतून शाळा करीत आहे. परंतु जि.प.अंतर्गत विद्यार्थ्यांना देय गणवेश निधी वितरीत करतांना संयुक्त शाळा अनुदान प्राप्त रक्कम कपात करून देण्यात आला.त्यामुळे बॅँकेतील शिल्लक रक्कम शुन्य होत असल्याने बॅँक खाते सुरू ठेवण्यात अडचण येत आहे. प्राप्त संयुक्त शाळा अनुदान या सत्राच्या सुरवातीला खर्च करू नये अशा कुठल्याही सूचना नव्हत्या.त्यामुळे अनेक शाळांनी सत्राच्या सुरवातीलाच रक्म खर्च केल्याने गणवेश निधीकरिता समायोजित केलेल्या रकमेत तफावत निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत शाळास्तरावर खर्च करण्यासाठी निधी उपलब्ध नाही.समग्र शिक्षा अभियानांतर्गत शाळेला मिळणारा गणवेश निधी हा अनेक शाळेत विद्यार्थी संख्येपेक्षा कमी उपलब्ध झालेला आहे. तो विद्यार्थी संख्येनुसार मिळावा, शिक्षकांचे वेतन दरमहा एक तारखेलाच व्हावे अशी मागणी करण्यात आली. निवेदन देतेवेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमराव बोरसे, जिल्हा सरचिटणीस भुपेश वाघ, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, तालुकाध्यक्ष दिलीप वाडेकर, खुशाल चित्ते, संजय ठाकूर आदी उपस्थित होते. 

टॅग्स :DhuleधुळेEducationशिक्षण