लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : राजस्थानला लग्नाला जाणारी व्हॅन धुळ्यानजिक महामार्गावरील हॉटेल नालंदाजवळ ट्रकला मागून जोरदार धडक दिली़ या अपघातात तीन जणांना दुखापत झाली़ अपघाताची ही घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली़औरंगाबादहून राजस्थानकडे लग्नासाठी व्हॅन जात होती़ शहरानजिक मुंबई आग्रा महामार्गावर हॉटेल नालंदाजवळील गतीरोधक असल्याने पहाटेच्या अंधारात ही बाब लक्षात न आल्यामुळे ट्रकचालकाने अचानक ब्रेक दाबला़ त्यामुळे मागून येणारी व्हॅन ट्रकवर जावून आदळली़ परिणामी व्हॅनचालकाने व्हॅन थांबविण्यासाठी ब्रेक दाबला़ परंतु व्हॅन वेगात असल्यामुळे ती ट्रकवर आदळली़़ या अपघातात सुशिला ताराचंद जोशी (४०), वर्षा सुशिल जोशी (३२) आणि रमेश जोशी यांना दुखापत झाली आहे़ सुदैवाने ८ वर्षाची बालिका सुखरुप आहे़ पहाटेच्यावेळी जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली़ जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले़ अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहचले़ मात्र, अंधाराचा फायदा घेत ट्रकचालक घटनास्थळावरुन फरार झाला आहे़ गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे़
राजस्थानकडे जाणााºया वºहाडीच्या व्हॅनला अपघात, ३ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 13:02 IST
धुळ्यानजिक घडली दुर्घटना, सुदैवाने बालिका बचावली
राजस्थानकडे जाणााºया वºहाडीच्या व्हॅनला अपघात, ३ जखमी
ठळक मुद्देमहामार्गावरील नालंदा हॉटेलजवळ घडला अपघातट्रकने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणारी व्हॅन धडकलीअपघातात तिघांना दुखापत, सुदैवाने बालिका बचावली