दरवर्षी जानेवारी महिन्यात भुईमूग पिकाची पेरणी होते. एप्रिल व मे महिन्यात पीक काढणीस सुरूवात होते. तऱ्हाडीसह परिसरात भुईमूग पीक काढणीस सुरूवात झाली आहे. कोरोना संसर्ग लक्षात घेता मजूर मिळणे कठीण झाले आहे. भुईमूग पीक काढणीस मजूरी दुप्पट वाढल्याने उत्पन्न येईल तेवढा खर्च बियाणे, खत, मजुरी, मशागत व मेहनत लक्षात घेता केलेला खर्च पण निघेना म्हणून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. पाण्याअभावी भुईमूग पीक पेरणी क्षेत्र कमी प्रमाणात झाले आहे. परंतु उत्पन्न चांगले येईल व भाव चांगला मिळेल व गुरांना चारा उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भुईमूग काढणीनंतर यापुढे खरिपाची तयारी करून कपाशी लागवड होणार, यासाठी शेतकरी लगबग करीत आहे.
तऱ्हाडी परिसरात भुईमूग पीक काढणीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:58 IST