लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर लळींग टोलनाक्याजवळ मोहाडी पोलिसांनी मादक पदार्थांची तस्करी करणाºया एका संशयिताला कारसह ताब्यात घेतले़ कारची तपासणी केली असता त्यात ४४ हजार ४०० रुपये किंमतीचा ११ किलो १०० ग्रॅम अफू आढळून आला आहे़ ३ लाख ४४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ ही कारवाई शुक्रवारी रात्री नऊ वाजता झाली़ उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांना अफूची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे पोलीस अधीक्षक एम़ रामकुमार, अपर पोलीस अधीक्षक विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील व त्यांच्या पथकाला सोबत घेऊन शहरानजिक लळींग टोलनाक्याजवळ सापळा लावण्यात आला़ शुक्रवारी रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास एमएच १९ सीएफ २५७९ क्रमांकाच्या पांढºया रंगाची कार येताच पोलिसांनी ती रोखली़ या कारची तपासणी केली असता कारमध्ये मादक पदार्थ असलेल्या अफूची बोंडे (डोडा) घेऊन शिरपूरहून नाशिककडे चोरट्या पध्दतीने घेऊन जात असल्याचे निष्पन्न झाले़ कारचालक मंगेश छोगालाल पावरा (३०, रा़ मांडळ, ता़ शिरपूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले़ त्याच्याकडून ४४ हजार ४०० रुपये किंमतीचा ११ किलो १०० ग्रॅम अफू असलेल्या दोन गोण्या असा एकूण ३ लाख ४४ हजार ४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे़ पोलीस कर्मचारी प्रभाकर ब्राम्हणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता संशयित मंगेश पावरा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला़ ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल राजपूत, पोलीस कर्मचारी राजेंद्र मराठे, प्रभाकर ब्राम्हणे, श्याम निकम, सुनील भावसार, गणेश भामरे, सचिन वाघ, जितेंद्र वाघ, सखाराम खांडेकर यांच्या पथकाने केली.
अफूची तस्करी रोखली; लळींग टोलनाक्याजवळील कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 18:17 IST
एकास अटक : ११ किलो मुद्देमालासह कारही जप्त
अफूची तस्करी रोखली; लळींग टोलनाक्याजवळील कारवाई
ठळक मुद्देलळींग टोल नाक्याजवळील कारवाईअफूच्या मुद्देमालासह एकास अटक