शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलगी बनली गर्भवती; युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल

By देवेंद्र पाठक | Updated: March 6, 2023 13:57 IST

बाळाचा झाला मृत्यू, धुळे तालुक्यातील घटनेने खळबळ

धुळे : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीचा विश्वास संपादन करण्यात आला. तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध आल्याने त्यातून ती गभर्वती झाली. बाळाला जन्मही दिला, पण त्याचा मृत्यू झाला. ही घटना सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या काळात घडली. याप्रकरणी रविवारी धुळे तालुका पोलिस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल झाला.धुळे तालुका पोलिस ठाण्यात पीडित मुलीने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, गावातील एकाने मैत्री केली. आपले लग्न जमले असल्याचे सांगून विश्वास संपादन केला. 

मैत्री वाढवत असताना वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. हे सर्व पीडितेच्या आणि संशयिताच्या घरी हा प्रकार घडत होता. सातत्याने ते वाढत गेल्याने यातून गर्भवती बनली. अल्पवयीन मुलगी गर्भवती बनल्याने गावात चर्चेला उधाण आले. हा प्रकार सप्टेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत घडला. तिची तब्येत खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने बाळाला जन्म दिला. पण, बाळाचे पुरेसे पोषण नसल्याने बाळाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पीडितेने धुळे तालुका पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी साडेबारा वाजता फिर्याद दाखल केली. त्यानुसार, एका विरोधात भादंवि कलम ३७६ (२) (एन) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ५ (जे) (२) (एल), ६ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तालुका पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस उपनिरीक्षक आर. डी. पाटील घटनेचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :DhuleधुळेCrime Newsगुन्हेगारी