शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आईने केलेला नवस फेडण्यासाठी डॉक्टर दाम्पत्याची तीर्थस्थळी पायी भ्रमंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 17:53 IST

२०२० मध्ये द्वारकेहून पायी निघाले, गावोगावी करतात मुक्काम

हर्षद गांधी

निजामपूर (धुळे): नोकरी करीत असताना दाेन्ही डोळ्यांची दृष्टी गेली. डॅाक्टरांनी शस्त्रक्रिया करूनही काहीच उपयोग होणार नाही असे सांगितले. पण शस्त्रक्रिया करा असा आईचा डॅाक्टरांकडे आईनं हट्ट केला. मुलासाठी आईचा सुरू असलेला हट्ट बघून डॅाक्टरही डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले. इकडे आई मंदिरात गेली. देवाजवळ नवस केला मुलाची दृष्टी परत आल्यास तो धार्मिक स्थळी पदयात्रा करेल असे आईने सांगितले. ‘देव’ला देवही पावला. दृष्टी परत आली. आईने देवाजवळ केलेला नवस फेडण्यासाठी डॅाक्टर दाम्पत्य धार्मिक स्थळी पदयात्रा करीत आहे. ही कहाणी आहे शास्त्रज्ञ डॉ. देव उपाध्याय व त्यांची पत्नी डॉ. सरोज उपाध्याय यांची. उपाध्याय दाम्पत्य शनिवारी निजामपूरात आले असता, त्यांच्या पदयात्रेचा उलगडा झाला.

डॅा.देव उपाध्याय हे मूळचे द्वारकेचे रहिवासी. त्यांनी लंडन येथील ॲाक्स्फर्ड विद्यापीठातून एस्ट्राेनॅामित पीएचडी केलेली आहे. शिवाय जीवशास्त्रातही ते निष्णात आहे. तर त्यांची पत्नी डाॅ. सरोज यांनी लंडन येथूनच मानसशास्त्रात पीएचडी केलेली आहे.अशी सुरू झाली पदयात्रापदयात्रेबाबत सांगतात डॅा. देव म्हणाले काही वर्षांपूर्वी अचानक दोन्ही डोळ्याची दृष्टी गेली. अनेक इलाज केले, पण उपयोग झाला नाही. एका डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करूनही काहीच उपयोग होणार नाही असे सांगितले. मात्र आईने डॉक्टरांकडे शस्त्रक्रिया करण्याचा हट्ट धरला. अखेर पुत्रप्रेमापोटी आईच्या हट्टापुढे डॅाक्टरही शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले.

इकडे शस्त्रक्रिया सुरू असताना, डॉ. देवर यांची आई भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात गेली. माझ्या मुलाची दृष्टी परत आल्यास मुलगा हरिद्वार, रामेश्वरम, पंढरपूर आदी आईची प्रार्थना ऐकली. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने, डॉ. देव हे पुन्हा जग बघू लागले. आईने केलेला नवस फेडण्यासाठी डॉ. देव उपाध्याय यांनी पदयात्रेचा निर्णय घेतला. मात्र पतीला एकटे सोडता येणार नाही म्हणून त्यांच्या पत्नी डॅा. सरोज उपाध्याय यांनीही पतीसोबतच पदयात्रा करण्याचा निर्णय घेतला.

२०२०पासून डॉ. उपाध्याय दाम्पत्य पायी द्वारकेहून पदयात्रेला निघालेले आहेत. दररोज २० ते २५ किलोमीटर ते प्रवास करतात. हरिद्वार, रामेश्वरम, तिरूपती बालाजी, पंढरपूर आदी धार्मिक स्थळी भेट देऊन ते परत द्वारकेकडे निघालेले आहेत.

टॅग्स :Dhuleधुळे