शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

डीपीडीसीच्या आठ जागांसाठी ९७ टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 18:55 IST

निवडणूक : १५ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद; जिल्हाधिकारी कार्यालयात आज मतमोजणी; दीड तासात निकाल येणार

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात मतमोजणीला गुरुवारी सकाळी दहा वाजेपासून प्रारंभ होणार आहे. एका टेबलावरच मतमोजणी होणार आहे. ही मतमोजणी निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय बोरूडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी तुकारमतमोजणीला सकाळी दहा वाजता सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण होईपर्यंत निवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश बंदी ठेवण्यात येणार आहे. उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरच थांबून निकालाची प्रतीक्षबुधवारी निवडणुकीच्या दिवशी दुपारी दीड वाजता वाजता निवडणुकीच्या रिंगणातील काही उमेदवारांनी त्यांच्या बाजूने असलेल्या मतदान फुटू नये, म्हणून मतदारांना थेट ट्रॅव्हल्समधून (जी. जे. १४ एक्स ८८८२) आणल्याचे चित्र जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुपारी दिसून आले.ह

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे  : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीडीसी) आठ जागांसाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील तीन केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. सायंकाळी पाच वाजेपर्यंत १४६ पैकी १४३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. दिवसभरात ९७.९५ टक्के  इतके मतदान झाले. या निवडणुकीसाठी १५ उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान, गुरुवारी, सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून दीड तासात निकाल हाती येण्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे. डीपीडीसीच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील जुने व नवीन नियोजन सभागृह, अपर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पार पडली. सकाळी ८ ते दुपारी १२ यावेळेत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. तर सायंकाळी साडे चार वाजेपर्यंत ९७.९५ टक्के इतके मतदान झाले. ९ पैकी एक जागा बिनविरोध २०११ च्या लोकसंख्येच्या निकषानुसार वाढीव ८ जागा, तर दोंडाईचा नगरपालिकेची (लहान  नागरी मतदार संघ) रिक्त झालेली १ अशा ९ जागांसाठी जिल्हा नियोजन समितीची निवडणूक घेण्यात येणार होती. परंतु, मोठ्या नागरी मतदार संघातून (महापालिका क्षेत्र) अनुसूचित जाती प्रवर्गाच्या राखीव जागेसाठी राष्टÑवादी कॉँग्रेस पार्टीचे नगरसेवक जितेंद्र शिरसाठ यांचा एकच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे  जिल्हा नियोजन विभागाने जाहीर केले होते. ८० महिलांनी बजावला हक्क डीपीडीसी निवडणुकीत ग्रामीण, लहान नागरी व नगरपंचायत मतदार संघातील १४६ मतदारांपैकी दिवसभरात १४३ मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत ६३ पुरुष व ८० महिला पदाधिकाºयांनी मतदान केले. तर ग्रामीण मतदार संघातून २ मतदार व नगरपंचायत मतदार संघातील एक मतदार मतदान करू शकले नाहीत.