केंद्र व राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागातर्फे स्वच्छ भारत मिशनच्या दुसऱ्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात येते आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात गाव हागणदारीमुक्त, त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात हागणदारीमुक्त अधिक ही संकल्पना राबवण्यात येते आहे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्तरावरील स्वच्छतेची कामे पूर्ण करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांना हागणदारीमुक्त अधिक मानांकनाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न होत आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १५ ऑगस्टला जिल्ह्यातील ८ गावे हागणदारीमुक्त अधिक म्हणून घोषित केली. त्यात धुळे तालुक्यातील भिरडाणे, विसरणे, साक्री तालुक्यातील मलांजन, लोणखेडी, शिंदखेडा तालुक्यातील वडदे, सुलवाडे व शिरपूर तालुक्यातील उप्परपिंड, जैतपूर या गावांचा समावेश आहे. हागणदारीमुक्त अधिक म्हणजे शौचालयाचे बांधकाम पुनर्प्रस्थापित करणे, सामुदायिक शौचालय संकुल घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन करून स्वच्छता कायम ठेवणे होय.
जिल्ह्यातील ८ गावे ओडीएफ प्लस घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:38 IST