शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

खान्देश मधून  शिक्षणाच्या वारीला ७५० शिक्षक जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 16:16 IST

नवोक्रम : नंदुरबारचे ३० जानेवारीला तर धुळे-जळगावचे शिक्षक १ फेब्रुवारीला भेट देणार

ठळक मुद्देप्रत्येक जिल्ह्यातून २५० शिक्षक व ५० शाळा व्यवस्थापन समिती सदस्य जाणारशिक्षणाच्या वारीचे दुसरे वर्षशिंदखेडा तालुक्यातील शिक्षकाची स्टॉलधारक म्हणून नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ अंतर्गत ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमाचे विभागस्तरावर आयोजन नाशिक येथे करण्यात आले आहे. यात खान्देशातून ७५० शिक्षक व १५० शालेय व्यवस्थापन समिती सदस्य  जातील. नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षक ३० जानेवारीला तर धुळे- जळगाव जिल्ह्यातील शिक्षक १ फेब्रुवारी २०१८ रोजी भेट देणार आहेत.शालेय शिक्षण विभागाद्वारे शैक्षणिक विचारांची उपयोगिता व परिणामकारकता याच्या आदानप्रदानासाठी विभाग पातळीवर ‘शिक्षणाची वारी’चे आयोजन करण्यात येत आहे. ‘शिक्षणाची वारी’आयोजनाचे हे दुसरे वर्ष आहे. या उपक्रमामध्ये विविध विषय, घटक, संकल्पना यावर काम करणाºया संस्था, व्यक्ती यांचे साधारण ५० स्टॉल उभारण्यात येणार आहेत.  या स्टॉलला भेट देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील २०० प्राथमिक व ५० माध्यमिक  शिक्षक  तसेच ५० शाळा व्यवस्थापन समिती सदस्य अशा ३०० जणांना प्रतिदिन बोलविण्यात येणार आहे. खान्देशातून  ९०० जण जाणारनाशिक विभागांतर्गत नाशिक येथेच या ‘शिक्षणाची वारी’ चे  आयोजन केले आहे. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील २५० शिक्षक व ५० व्यवस्थापन समिती सदस्य ३० जानेवारी २०१८ रोजी शिक्षणाच्या वारीला भेट देतील. तर धुळे व जळगाव जिल्ह्यातील ५०० शिक्षक व १०० व्यवस्थापन समिती सदस्य १ फेब्रुवारी २०१८ रोजी शिक्षण वारीला भेट देणार आहे.मोरे यांची स्टॉलधारक म्हणून निवडधुळे जिल्ह्यातून चुडाणे (ता. शिंदखेडा) येथील जि.प.शिक्षक सुनील दौलत मोरे यांची ‘माझी कला-कार्यानुभव’ या विषयांतर्गत ‘शिक्षणाची वारी’साठी स्टॉलधारक म्हणून निवड झालेली आहे. त्यांच्यासोबत शिंदखेडा तालुक्यातील जि.प.शाळेतील जगन दयाराम वाडीले (झिरवे),  संतोष चिंधा साळुंके (बाम्हणे), योगिता बळवंत बोरसे (साबरहटी), महेंद्र रामदास महाजन (वरसूस)  हे देखील असणार आहेत.प्रगत शैक्षणिक महाराष्टÑ उपक्रमांतर्गत १०० टक्के गुणवत्तापूर्ण शिक्षण ज्या शाळांमध्ये झाले, त्या शाळेतील उपक्रमशिल शिक्षकांनी केलेल्या ज्ञानरचनावादी साहित्य निर्मितीचा स्टॉलचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती सर्व शिक्षा अभियानाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी सुधाकर बागूल यांनी दिली.