शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळातील ६४२ चालक आरटीओकडे प्रती नियुक्तीवर वर्ग होणार

By सचिन देव | Updated: March 22, 2024 19:55 IST

अपघातांवर नियंत्रण येणार : वायुवेग वाहनासाठी आरटीओकडे चालकांची कमतरता

धुळे: राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओतर्फे सुरक्षित वाहतुकीसाठी व अपघातांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नवीन इंटरसेप्ट वाहने सुरू करण्यात येत आहेत. मात्र, सध्या स्थितीला राज्यभरात आरटीओकडे चालकांची कमतरता असल्यामुळे, ही वाहने चालविण्यासाठी एसटी महामंडळाच्या चालकांचीमदत घेण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळातर्फेही आरटीओला विभागाकडे राज्यभरातील ६४२ चालक प्रतिनियुक्तीवर वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही महिन्यात गेल्या काही महिन्यात राज्यातील विविध महामार्गांवर अपघाताच्या मोठ्या प्रमाणात घटना घडल्या असून, यात अनेक चालक मद्य प्राशन करून बेजाबदार वाहने चालवित असल्याचे प्रकार आरटीओच्या निदर्शनास आले आहेत. तसेच मोबाईलवर बोलणे, वाहतुकीच्या मर्यांदाचे उल्लंघन करणे, मुदतबाह्य वाहने रस्त्यावर चालविणे, वाहन परवाना नसणे आदी कारणांमुळे देखील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढत असल्यामुळे राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागातर्फे या घटनांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील आरटीओ विभागाला इंटरसेप्ट वायुवेग वाहने पुरविण्यात येणार आहे.

या वाहने चालविण्यासाठी आरटीओकडे पुरेसे चालक नसल्यामुळे, एसटी महामंडळातील अतिरिक्त चालक आरटीओकडे वर्ग करण्यात येणार आहे. आरटीकडे एकूण ६४२ चालक वर्ग करण्यात येणार असून, सुरूवातीला ४५१ चालकांची पूर्तता करण्यात येणार आहे. त्यासाठी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी राज्यातील सर्व विभाग नियंत्रक यांना पत्र पाठवून, अतिरिक्त कनिष्ठतम चालकांची यादी मागविली आहे.

तर चालकांचा पगार एसटी महामंडळच करणार..

एसटी महामंडळातर्फे आरटीओ विभागाकडे चालक वर्ग करण्यात आल्यानंतर, या कर्मचाऱ्यांचा पगार मात्र एसटी महामंडळातर्फेच केला जाणार आहे. हे चालकांचीमुळ नियुक्ती एसटी महामंडळात असल्याने आरटीओत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आल्यानंतरही, या चालकांना एसटी महामंडळाच्या नियमानुसार वेतन, भत्ते व इतर सुविधा लागू राहणार असल्याचे विभाग नियंत्रकांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

आरटीओ मध्ये अतिरिक्त चालक पाठविण्याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडून पत्र प्राप्त झाले आहे. या पत्रानुसार धुळे विभागातर्फे अतिरिक्त चालकपाठविण्याबाबत पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे.- सौरभ देवरे, विभागीय वाहतुक अधिकारी, एसटी महामंडळ, धुळे विभाग.

टॅग्स :Dhuleधुळे