शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

धुळ्यासाठी ५० व्हेंटिलेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 21:34 IST

पीएम केअर फंड : तातडीने कार्यान्वित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

धुळे : पीएम केअर निधीतून वैद्यकीय महाविद्यालयास ५० व्हेन्टिलेटर्स उपलब्ध झाले आहेत. ते तातडीने कार्यान्वित करून घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले़सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखतानाच साथीचे आजार वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी. या काळात सर्पदंशाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्पदंशावरील लसीचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा. तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांनी मुख्यालयीच थांबावे, असेही निर्देश त्यांनी दिले़ यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आयसीयू कक्ष, आॅक्सिजनयुक्त बेड निर्मिती, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना, लसीकरण मोहीम, कोविड केअर सेंटरमधील सीसीटीव्ही यंत्रणा आणि लॉकडाऊनचा सविस्तर आढावा घेतला.कोरोना विषाणूचे अहवाल वेळेत उपलब्ध होण्यासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाने समन्वयक नियुक्त करून अहवाल दोन दिवसांत मिळतील, असे नियोजन करावे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपकार्तील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी संजय यादव यांनी दिले आहेत.कोरोना विषाणूबाधित रुग्णसंख्या आणि उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मती सी., वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, श्रीकुमार चिंचकर (कोविड १९ समन्वयक), उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. मनीष पाटील, जिल्हा रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी तथा कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. अरुण मोरे, डॉ. निर्मल रवंदळे, महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश गिरी आदी उपस्थित होते.कोरोना विषाणूच्या बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेने अधिक सतर्क होत बाधितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची तपासणी करावी. ही मोहीम व्यापक स्वरुपात राबवावी. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची तत्काळ नियुक्ती करावी. तसेच वैद्यकीय अधिकारी नियुक्तीची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेसाठी तंत्रज्ञ उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले़शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सापळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश मोरे यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर सुरू असलेल्या औषधोपचाराची सविस्तर माहिती दिली.खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या मागणीनुसार केंद्रशासनाने पीएम केअर फंडातून हिरे वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला ५० व्हेंटिलेटर दिले आहेत़ व्हेंटिलेटर मिळाल्यामुळे गंभीर रुग्णांवर उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे होईल, अशी माहिती खासदार भामरे यांनी दिली़

टॅग्स :Dhuleधुळे