शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर तालुक्यात ७० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2019 12:09 IST

विधानसभा निवडणूक : लढतीतील चुरशीमुळे निकालाकडे लक्ष, २४ रोजी मतमोजणी

शिरपूर : शिरपूर विधानसभा निवडणूकीसाठी सोमवारी मतदान घेण्यात आले़ सरासरी ७० टक्के मतदान होवून निवडणूक रिंगणातील ७ उमेदवारांचे भाग्य इलेक्ट्रॉनिक यंत्रामध्ये ईव्हीएम सीलबंद झाले़ मतमोजणी २४ ला सकाळी सुरू होणार आहे़शिरपूर विधानसभा मतदारसंघात सकाळी ७ वाजेपासून मतदानास सुरूवात झाली़ सकाळीच बहुतांश मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या, परंतु मॉकपोल उशिरा घेतल्यामुळे काही मतदान केंद्रावर १०-१५ मिनीटे मतदान करण्यास उशिरा झाले़ तसेच शहरातील ब्रम्हटेक भागातील मतदान केंद्र २२३ वर व्हीव्हीपॅट नादुरूस्त झाल्यामुळे तब्बल ४० मिनीटे मतदान करण्यास उशिर झाला़ अखेर ते बदल्यानंतर मतदान सुरू झाले़शिरपूर विधानसभेसाठी ३१९ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले़ पुरूष मतदार १ लाख ६३ हजार ५३८ तर महिला मतदार १ लाख ५७ हजार २१ असे एकूण ३ लाख २० हजार ५५९ मतदार होते़ सकाळी ९ वाजेपर्यंत ९ टक्के, सकाळी ११ वाजेपर्यंत २३़३४, दुपारी १ वाजेपर्यंत ३८़१७, दुपारी ३ वाजेपर्यंत ५२़६७ तर संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६२़४७ टक्के इतके मतदान झाले़ त्यानंतर मात्र केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या़ सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रावर गर्दी होती़ संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७० टक्के मतदान होईल असा प्राथमिक अंदाज आहे़सकाळी ७ वाजता मतदानाला सुरूवात झाल्यानंतर काही भागातील मतदान केंद्रावर भल्या मोठ्या रांगा दिसून आल्यात़ त्यानंतर दुपारच्या वेळेस थोडा वेग मंदावला़ काही ठिकाणी तर पूर्णपणे शुकशुकाट होता़ शहरातील मुस्लीम बहुल वस्तीतील मतदान केंद्रावर मोठ-मोठ्या रांगा दिसून आल्यात़ पुरूषांपेक्षा अनेक ठिकाणी महिला मतदारांची गर्दी दिसून आली़ मतदान करतांना शासकीय अधिकृत ओळखपत्र ग्राह्य धरले जात होते़तरुणांमध्ये ‘सेल्फी’ची क्रेझअपंगासाठी व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आलेली होती़ शिरपूर शहरात उमेदवारांकडून मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहनांचा वापर करण्यात आला़ उत्साही तरूणांनी मतदानानंतर स्वत:चे सेल्फी फोटो काढून सोशल मीडियावर टाकले जात होते़ मतदारसंघात ७ उमेदवार रिंगणात असले तरी मुख्य लढत ही महायुतीचे काशिराम पावरा व अपक्ष उमेदवार डॉ़जितेंद्र ठाकूर यांच्यात आहे़

टॅग्स :Dhuleधुळे