धुळे : जिल्ह्यातील आणखी ५ जणांचे अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आले. एकूण बाधित रुग्णांची संख्या १४ हजार ७६३ इतकी झाली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार, जिल्हा रुग्णालय धुळे येथील सर्व १९२ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील सर्व १४१ अहवाल निगेटिव्ह आले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील सर्व ९८ अहवाल निगेटिव्ह आले. तसेच भाडणे येथील सर्व २६अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महानगरपालिका रॅपिड अँटिजेन टेस्टमधील १५७ अहवालांपैकी ३ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात, गणेशनगर १, जीटीपी स्टॉप १, कैलासनगर येथील एकाचा समावेश आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील १२ अहवालांपैकी फागणे येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एसीपीएम प्रयोगशाळेतील एक अहवाल निगेटिव्ह आला, तर खासगी प्रयोगशाळेतील १८ अहवालांपैकी समतानगर; शासकीय दूध डेअरी मागे येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
५ अहवाल पॉझिटिव्ह, मृत्यू नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:37 IST