शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

२६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडीसेविका संपावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 17:01 IST

उर्वरित अंगणवाड्या नियमित सुरू

ठळक मुद्दे२३ सप्टेंबरपासून  जिल्हयातील १८३९ अंगणवाडी केंद्र नियमित सुरू झालेली आहेत.  साक्री, पिंपळनेर, व दहीवेल या भागातील  २६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, अद्यापही संपावर आहेत.तेथील अंगणवाडी केंद्रातील बालकांना बचतगटाच्या माध्यमातून नियमितपणे पोषण आहार

लोकमत न्यूज नेटवर्कधुळे : शासनाने दिलेली मानधनवाढ समाधानकारक नसल्याचे कारण देत जिल्ह्यातील २६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडीसेविका, मदतनीस, या अजुनही संपावर असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या एकात्मिक महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आलेली आहे.अंगणवाडी सेविकांना किमान १८ हजार रूपये मासिक वेतन देण्यात यावे, सेवानिवृत्तीच्या लाभाची रक्कम एक लाखा ऐवजी दोन लाख रूपये करण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना वर्ग चारचा दर्जा देण्यात यावा यासह विविध त्यांनी  ९ सप्टेंबरपासून बेमुदत संप पुकारलेला होता. जिल्ह्यातील २१०४ अंगणवाड्यांमधील सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाड्यामधील कर्मचारी संपात सहभागी झाल्या होत्या.दरम्यान महिला व बालविकास विभागाने अंगणवाडी सेविकांना १५०० रूपये, मदतनीसांना १ हजार रूपये तर मिनी अंगणवाडी सेविकांना १२५० रूपये दरमहा मानधनवाढ व भाऊबीज एक हजार रूपये ऐवजी दोन हजार रूपये देण्याचे प्रस्ताव ठेवला. महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने शासनाची भूमिका मान्य करीत संप मागे घेतला.  २३ सप्टेंबरपासून  जिल्हयातील १८३९ अंगणवाडी केंद्र नियमित सुरू झालेली आहेत. मात्र शासनाने प्रस्तावित केलेली मानधानवाढ समाधानकारक नसल्याने जिल्ह्यातील साक्री, पिंपळनेर, व दहीवेल या भागातील  २६५ केंद्रावरील ४८६ अंगणवाडी सेविका, मदतनीस, अद्यापही संपावर आहेत. यात २४१ सेविका, २२१ मदतनीस व २४ मीनी अंगणवाडीसेविका यांचा समावेश आहे. दरम्यान साक्री, पिंपळनेर, दहीवेल या भागातील अंगणवाडीसेविका, मदतनीस संपावर असल्या तरी तेथील अंगणवाडी केंद्रातील बालकांना बचतगटाच्या माध्यमातून नियमितपणे पोषण आहार दिला जात असल्याची माहिती एकात्मिक महिला व बालविकास विभागाचे कक्ष अधिकारी शा.ना.जगताप यांनी दिली.