शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

४७ लाखांचा घोटाळा अन् ३३ वर्षांनी निकाल, लघुसिंचन अपहारात भास्कर वाघ व वसावे दोषी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 06:34 IST

Dhule scam News: सुमारे ३३ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात बनावट धनादेशांद्वारे ४७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी २६ जणांविरुद्ध गुन्हा झाला भास्कर दाखल होता.

धुळे - सुमारे ३३ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागात बनावट धनादेशांद्वारे ४७ लाखांचा अपहार केल्याप्रकरणी २६ जणांविरुद्ध गुन्हा झाला भास्कर दाखल होता. वाघ भास्कर वाघ आणि सखाराम वसावे या दोघांना विविध कलमांन्वये विशेष न्यायाधीश एफ. ए. एम. ख्वॉजा यांनी दोषी ठरवत शिक्षा दिली. वाघ हा १९९४ पासून येरवडा कारागृहात आहे.

३० डिसेंबर १९८८ ते २५ सप्टेंबर १९८९ या कालावधीत अपहार झाला. एकूण २६ जणांविरुद्ध खटला दाखल झाला होता. पैकी १७ संशयित मृत झाले असून, नऊ जण हयात आहेत. नऊपैकी भास्कर वाघ आणि सखाराम वसावे यांना शिक्षा झाली असून, सबळ पुराव्यांअभावी जगन्नाथ पवार, अशोक पवार, गुलफाम शेख, रामदास रामजादे, कृष्णलाल शहा, शिवकुमार जोशी व रामचंद्र महाले यांची निर्दोष मुक्तता झाली, अशी माहिती विशेष सरकारी वकील संभाजीराव देवकर यांनी दिली.

वाघ १९९४ पासून तुरुंगातच..!भास्कर वाघ याच्यावर १४ गुन्हे दाखल आहेत. यापैकी दहा खटल्यांचा निकाल लागला आहे, तर उर्वरित खटले न्यायप्रविष्ठ आहेत. वाघ हे सन १९९४ पासून जन्मठेपेची शिक्षा भोगत असून, त्यांची रवानगी येरवडा जेलमध्ये झालेली आहे. त्यांना १० खटल्यांमध्ये एकत्रित १३० वर्षांची शिक्षा झालेली आहे.

विविध कलमांखाली दाखल होते गुन्हेगुन्हा सिद्ध झाल्याने भादवि कलम १२० ब नुसार ४ वर्षे सक्तमजुरी, पाच हजार दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी कैद, भादंवि ४०९ अन्यये सात वर्षे सक्तमजुरी, एक लाख रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष साधी केंद. भादंवि ४६७ नुसार ७ वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, केवळ भास्कर वाघ याच्यावर ४७१ अ नुसार गुन्हा सिद्ध झाल्याने ५ वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपये दंड, तर १३-१-ड आणि १३-२ अन्वये सात वर्षे सक्तमजुरी आणि १० हजार दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली.

टॅग्स :Courtन्यायालयDhuleधुळेCorruptionभ्रष्टाचार